ETV Bharat / state

शिवछत्रपती पुरस्कार मिळवूनही 'या' खेळाचे खेळाडू उपेक्षितच - aatya patya game bhandara

यावर्षी भंडारा जिल्ह्यातील दोन खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे. यापैकी एक प्रिया गोमासे ही आट्यापाट्या खेळाची खेळाडू आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिचा आनंद तिला शब्दातही व्यक्त करता येत नव्हता. मात्र, तरीही या पुरस्काराचा भविष्य घडविण्यासाठी कोणताही फायदा नाही.

bhandara
शिवछत्रपती पुरस्कार मिळवूनही 'या' खेळाचे खेळाडू उपेक्षितच
author img

By

Published : Feb 21, 2020, 10:29 AM IST

भंडारा - महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी सर्वात मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतरही आट्यापाट्या खेळाच्या खेळाडूंची निव्वळ उपेक्षा होत आहे. हा पुरस्कार मिळावा, अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. मात्र, पुरस्कार मिळाल्यानंतर ही आट्यापाट्या या खेळाचे खेळाडू का उपेक्षित जीवन जगावे लागते आहे. शासन त्यांनाही न्याय देणार का? असा या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

शिवछत्रपती पुरस्कार मिळवूनही 'या' खेळाचे खेळाडू उपेक्षितच

यावर्षी भंडारा जिल्ह्यातील दोन खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे. यापैकी एक प्रिया गोमासे ही आट्यापाट्या खेळाची खेळाडू आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिचा आनंद तिला शब्दातही व्यक्त करता येत नव्हता. मात्र, तरीही या पुरस्काराचा भविष्य घडविण्यासाठी कोणताही फायदा नाही. याची जाणीव तीला आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वात पहिले स्वाती नंदागवळी हिला आट्यापाट्या या खेळासाठी हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर पंकज पराते, मागच्या वर्षी दिपाली शहारे आणि कल्याणी बंदेवार या मुलींना आणि यावर्षी प्रिया गोमासे हिला हा पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा - भंडाऱ्यातील २ खेळाडूंना मिळाला मानाचा छत्रपती पुरस्कार

तर संपूर्ण महाराष्ट्रात 30 ते 35 खेळाडूंना आट्यापट्यासाठी शिवछत्रपती पुरस्कार मिळाले आहे. मात्र 2015 पासून या खेळाचा 5% आरक्षणाचा कोटा बंद करण्यात आल्यामुळे मानाच्या पुरस्कार प्राप्त खेळाडूंना नोकरीत संधी मिळत नाही. केवळ पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना महानगरपालिकेमध्ये नोकरीत समाविष्ट करण्यात आले. मात्र, महाराष्ट्रातील इतर आट्यापाट्या खेळाडूंची उपेक्षाच होत आहे. एवढेच नाही तर मागील वीस वर्षांपासून भंडारा इथे आट्यापाट्याचा सराव सुरू आहे. त्यासाठी या खेळाडूंना हक्काचे मैदानही नाही. विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा नाही. अशा कठीण परिस्थिती खेळाडू सराव करतात आणि केवळ सराव करत नाही तर महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार ही मिळवतात.

हेही वाचा -खुल्या जलतरण स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद, नाना पटोलेंचीही उपस्थिती

या खेळाचा शाळा आणि कॉलेजमध्ये फक्त राज्य स्तरापर्यंत समावेश आहे. मात्र, राष्ट्रीय स्तरावर याचा अजूनही समावेश झाला नाही. या खेळाकडे ज्याप्रमाणे शासन दुर्लक्ष आहे हे अतिशय वाईट असून क्रीडा मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे. या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून या खेळाला नोकरीमध्ये पाच टक्क्यांचे आरक्षण पुन्हा मिळवून द्यावे. या खेळाला राष्ट्रीय स्तरापर्यंत समायोजन करून घ्यावे आणि सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे मैदान आणि सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.