भंडारा - लाखांदूर तालुक्यातील ढोलसर गावात राहणारा लोकेश देवराम शिवणकर हे (40) गणपती विसर्जनावेळी मासळ शेतशिवारातील नाल्यावरुन वाहून गेल्याची घटना घडली आहे.
ढोलसरवरुन विसर्जनाची मिरवणूक येत असताना मासळ-बाचेवाडी रस्त्यावरील नाल्यावर मूर्ती विसर्जन करताना पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले आहेत. मृताच्या मागे पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.
उपस्थित नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु, पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्याला वाचवण्यात अपयश आले. गेल्या काही दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने नद्या-नाले दुथडी वाहत आहेत.