ETV Bharat / state

सांग भाऊ कोण जिंकणार? भंडारा-गोंदिया मतदारसंघात जनसामान्यांत चर्चा - bhandara gonidia Lok sabha constituency

गेल्या ११ एप्रिलला भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रासाठी मतदान झाले. मात्र, या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. त्यामुळे पुढील ४४ दिवस उमेदवारांना निकालाची ताटकळत वाट पाहावी लागणार आहे. मात्र, निकाल काय असणार? याची सर्वात जास्त उत्सुकता मतदार, राजकीय कार्यकर्त्यांना लागलेली आहे.

निवडणुकीच्या निकालावर चर्चा करताना जनसामान्य
author img

By

Published : Apr 13, 2019, 5:17 PM IST

भंडारा - भंडारा-गोंदिया मतदारसंघातून कोणता उमेदवार जिंकणार? या एकाच विषयावर चर्चा सुरू झाली आहे. राजकीय विश्लेषकांसोबत जनसामान्यही आपआपल्यापरीने मतांची गोळाबेरीज करण्यात व्यस्त झाले आहेत. ११ एप्रिलला मतदान झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाण, शासकीय कार्यालयासह प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न ऐकायला मिळतो, तो म्हणजे सांग, भाऊ कोण जिंकणार?

निवडणुकीच्या निकालावर चर्चा करताना जनसामान्य

गेल्या ११ एप्रिलला भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रासाठी मतदान झाले. मात्र, या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. त्यामुळे पुढील ४४ दिवस उमेदवारांना निकालाची ताटकळत वाट पाहावी लागणार आहे. मात्र, निकाल काय असणार? याची सर्वात जास्त उत्सुकता मतदार, राजकीय कार्यकर्त्यांना लागलेली आहे.

उन्हाचा तडाखा वाढला आहे. रोजगार, पाणीटंचाई, वाढती महागाई, असे अनेक प्रश्न जिल्ह्यात आहेत. मात्र, सध्या भंडारा जिल्ह्यात कुठे ही फिरकले तरी निवडणुकीच्या निकालावरच चर्चा रंगलेल्या दिसतात. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात १४ उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत ही भाजपचे सुनील मेंढे आणि राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांच्यामध्ये आहे. आता यापैकी कोणाला कोणत्या तालुक्यातून, जिल्हा परिषद क्षेत्रातून आणि गावातून किती मते मिळाली? त्यातच कोणत्या जातीने कोणत्या पक्षाला मतदान केले? याविषयी भाजप आणि राष्ट्रवादीची बेरीज-वजाबाकी सुरू आहे.

सर्वसामान्य मतदार, लहान कार्यकर्ते मात्र वेगळ्याच पद्धतीने विश्लेषण करताना दिसतात. गावात कोणी किती पैसा वाटला? कोणत्या जातीच्या लोकांनी मतदानाच्या पहिल्या रात्री कशा पद्धतीने जातीचे राजकारण चालवले? एवढेच नाहीतर मागील निवडणुकीत कुठे कमळ चालले होते. या निवडणुकीत त्याठिकाणी घडी चालली की कमळ? या विषयावर त्यांच्या चर्चा चाललेल्या असतात. प्रसंगी ही मंडळी पैज लावण्यासही तयार झालेली पाहायला मिळत आहे.

उमेदवार जिंकल्यानंतर त्यांना काय फायदा किंवा तोटा होणार? याबद्दल त्यांना पुरेपुर कल्पना असते. मात्र, तरीही मोठ्या पोटतिडकीने विचारतात, सांग भाऊ कोण येणार निवडून? येत्या २३ मे'ला निकाल लागणारच आहे. मात्र, तोपर्यंत अशा चर्चा सुरूच राहतील.

Intro:ANC : 11 तारखेला मतदान झाले आणि 12 तारखेपासून जिल्ह्यात सर्वत्र एकच विषय चर्चेचा बनला आहे तो म्हणजे सांगा भाऊ कोण निवडून येईल, सार्वजनिक ठिकाणी, दुकान, पान टपरी, शासकीय कार्यालय, राजकीय ऑफिस प्रत्येक ठिकाणी कोण निवडून येईल या विषयी चर्चा सुरू आहेत.

Body:11 एप्रिल ला भंडारा -गोंदिया लोकसभा क्षेत्रासाठी मतदान झाले मात्र याचा निकाल 23 मे ला लागणार आहे त्यामुळे पुढच्या 44 दिवस बिचाऱ्या उमेदवारांना निकालाची ताटकळत वाट पाहावी लागेल, मात्र निकाल काय असणार याची सर्वात ज्यास्त मतदार, राजकीय कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे आहे त्यांना उत्साहा एवढा ज्यास्त आहे की लोकांसाठी सर्वात महत्वपूर्ण विषय बनला आहे की कोण जिंकणार.

उन्हाचा तडाखा वाढला आहे, रोजगाराचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न आहेत, वाढलेल्या महागाईचे प्रश्न आहेत, एवढे ज्वलंत प्रश्न जिल्ह्यात आहेत मात्र सध्या तुम्ही भंडारा जिल्ह्यात कुठे ही जा एका पेक्षा ज्यास्त व्यक्ती एखाद्या विषयावर चर्चा करतांना दिसल्यास त्यांचा विषय हा उमेदवार कोण जिंकणार आणि कसा जिंकणार हाच असेल, या चर्चा येवढ्या मजेदार असतात बरेचदा तुम्ही कधी त्यांच्या चर्चेचा हिस्सा होता याची जाणीव ही तुम्हला होत नाही.

भंडारा - गोंदिया जिल्ह्यत 14 उमेदवार रिंगणात होते मात्र खरी लढत ही भाजपा चे सुनील मेंढे आणि राष्ट्रवादी चे नाना पंचबुद्धे यांच्यात आहे. आता या पैकी कोणाला कोणत्या तालुक्यातून, जिल्हा परिषद क्षेत्रातून आणि गावातून किती मते मिळाली, त्यातच कोणत्या जातीने कोणत्या पक्षाला मतदान केले या विषयी भाजप आणि राष्ट्रवादी यांचे बेरीज वजाबाकी सुरू आहे आणि या वरून ते त्यांच्या पक्षाचे उमेदवार अंदाजे किती मत घेत आहे, किती ने आघाडी आहे किंवा किती मतांनी पराभव होऊ शकतो याचे गणित करीत आहेत.

या उलट सर्वसामान्य मतदार लहान कार्यकर्ते मात्र वेगळ्याच पद्धतीने विश्लेषण करतात, गावात कोणी किती पैसा वाटला, कोणत्या जातीच्या लोकांनी मतदानाच्या पहिल्या रात्री कश्या पद्धतीने जातीचे राजकारण चालविले, मागच्या निवडणुकीत कुठे फुल चालला होता या निवडणुकीत त्या ठिकाणी घडी चालली की फुल दावा तो करतो एवढंच काय तर काही मंडळी तर पैज लावण्यास तयार होतात की फुल जिंकेल की घडी या व्यक्तींना हे भाष्य करतांना बघितल्यावर काही काळ त्यांच्या आत्मविश्वासहवर किती विश्वास करावा असा प्रश्न निर्माण होतो.

उमेदवार कोणी ही निवडून येवो या चर्चाविरणा या तुन अजिबात फायदा किंवा तोटा होणार नाही मात्र तरीही मोठ्या पोटतिडकीने विचारतात, सांग भाऊ कोण येणार निवडून आणि दुसरा जणू खूप मोठा विश्लेषक असल्यासारखा त्याला विश्लेषण करून सांगतो.
23 तारखेला निकाल कोणच्या बाजूने लागेल हे कळेल मात्र तो पर्यंत या चर्चा अश्याच सुरू राहणार आहेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.