ETV Bharat / state

कायद्याचे बंधन केवळ सामान्य लोकांसाठीच का? नेत्यांना भेटताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

तहसील कार्यालयात आढावा घेण्याकरिता सुनील केदार आले असताना सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले असल्याचे दिसले. तसेच जिथे आढावा बैठक घेण्यात आली. तिथेही सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले गेले नाही.

कायद्याचे बंधन केवळ सामान्य लोकांसाठीच का? नेत्यांना भेटताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कायद्याचे बंधन केवळ सामान्य लोकांसाठीच का? नेत्यांना भेटताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
author img

By

Published : Apr 24, 2020, 5:36 PM IST

भंडारा - लॉकडाऊनच्या काळात भंडारा जिल्ह्यात अन्नधान्याची सध्या काय परिस्थिती आहे, याची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री सुनील केदार यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठक ठेवली होती. मात्र, पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडविला आहे. बहुतेक लॉकडाऊनमध्ये असलेले कायदे केवळ सामान्य लोकांसाठीच आहेत असाच आविर्भाव या कार्यकर्त्यांचा होता.

कायद्याचे बंधन केवळ सामान्य लोकांसाठीच का? नेत्यांना भेटताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्याचेही बंधन शासनाने घातले आहे. तसे आदेशही पारित करण्यात आले आहेत. मात्र, हे आदेश मंत्रांच्या कार्यकर्त्यांसाठी नसावे आणि म्हणूनच जमावबंदी असताना 5 पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ नये, असे आदेश असूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आपल्या नेत्याला भेटायला आले. तहसील कार्यालयात आढावा घेण्याकरिता सुनील केदार आले असताना सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले असल्याचे दिसले. तसेच जिथे आढावा बैठक घेण्यात आली. तिथेही सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले गेले नाही. याठिकाणी पालकमंत्री यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी चांगलीच गर्दी केली. मोठ्या प्रमाणात चारचाकी आणि दुचाकी जमल्या होत्या.

तहसील कार्यालयाच्या परिसरात एखादा समारोह असावा असे दृश्य होते. पण जमावबंदी किंवा सोशल डिस्टनसिंग आणि तोंडावर मास्क न बांधलेल्या या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करेल कोण, पोलीस विभागातील किंवा प्रशासकीय विभागातील कोणीही अधिकारी कायद्याचे उल्लंघन झाले म्हणून कारवाईला धजावणार नाही. कारण जो कारवाईसाठी पुढे येईल त्यांच्या नोकरीतील तो सर्वात वाईट दिवस ठरेल. अशाच एका अधिकाऱ्यांनी माध्यमांना प्रश्न केला की नियम हे फक्त सामान्य नागरिकांसाठीच असतात का? भंडारा जिल्हा जरी ग्रीन झोनमध्ये असला तरी रेड झोनमधून पालकमंत्री येतात कसे, असा प्रश्न काहीच दिवस आधी खासदार सुनील मेंढे यांनी विचारला होता. त्यांच्या नेहमी येण्याने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्याप्रमाणे सर्व नियम धाब्यावर बसविले आहे या सर्व कारणाने भंडाऱ्यामध्ये कोरोनाचा प्रसार झाल्यास याची जवाबदारी कोणाची असेल, असा सवाल उपस्थित झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.