ETV Bharat / state

भुकटी प्रकल्पाला दूध पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची थकबाकी तात्काळ देण्याचे आदेश

भंडारा जिल्हयातील बंद असलेला दुधभुकटी प्रकल्प सुरू केला आहे. मात्र, या प्रकल्पासाठी दूध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर मिळत नसल्याच्या तशीच बऱ्याच शेतकऱ्यांची जुनी थकबाकी असल्याच्या तक्रारी आहेत.

Bhandara District News
भंडारा जिल्हा बातमी
author img

By

Published : Jun 9, 2020, 8:55 PM IST

भंडारा - जिल्ह्यात सुरू असलेल्या दुग्ध भूकटी प्रकल्पाला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच एका आठवड्यामध्ये रक्कम मिळणार आहे. तसे आदेश दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी अधिकाऱ्यांंना दिले आहेत.

कोरोना संकटकाळातील लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भंडारा जिल्हयातील बंद असलेला दुधभुकटी प्रकल्प सुरू केला आहे. मात्र, या प्रकल्पासाठी दूध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर मिळत नसल्याच्या तशीच बऱ्याच शेतकऱ्यांची जुनी थकबाकी असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे थकबाकी रक्कम तातडीने अदा करण्यात यावी. या संदर्भात एक आठवडयापेक्षा जास्त दिवस रक्कम थकीत राहता कामा नये, यादृष्टीने सर्व स्तरावर अत्यंतिक दक्षता घेण्यात यावी, असे स्पष्ट आदेश पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि पालकमंत्री सुनिल केदार यांनी संबंधितांना दिले.

आज (मंगळवारी) विधान भवन, मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली दूध भुकटी प्रकल्पासंदर्भात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी केदार यांनी व्यवस्थापकीय संचालक महानंदसह सर्व संबंधितांना अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दुधाची रक्कम तातडीने मिळण्यासंदर्भात सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक नरेश गिते, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेतीमाल आणि दूध उत्पादक शेतकरी कोरोना लॉकडाऊन काळामुळे तीव्र संकटात सापडला आहे. त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने भंडारा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पुढाकाराने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री सुनिल केदार यांच्या प्रयत्नातून हा दुध भुकटी प्रकल्प युध्दपातळीवर कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, मात्र पुरवठा केलेल्या दुधाचा मोबदला शेतकऱ्यांना तातडीने प्राप्त होणे आवश्यक असल्याने आवश्यक उपाय योजण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

दूध उत्पादकांच्या हितासाठीचा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने अविरत सुरु रहावा, दूध उत्पादकांना तातडीने मोबदला मिळावा, तयार झालेली दूध पावडर व अन्य उत्पादन यांची उचित वाहतूक व्यवस्था व्हावी, यादृष्टीने या उच्च स्तरीय बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.