ETV Bharat / state

Naeem Khan Murder : गोबरवाई येथे रेल्वे क्रॉसिंगजवळ मोक्का आरोपी नईम खान याची गोळ्या झाडून हत्या - bhandara crime

Naeem Khan Murder : भंडारा जिल्हा गॅंगवॉरमुळं नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा गोबरवाई येथे रेल्वे क्रॉसिंगजवळ मोक्का आरोपी नईम खान याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. त्यामुळं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.

Naeem Khan Murder
मोक्का आरोपी नईम खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 7:15 PM IST

Updated : Sep 25, 2023, 7:52 PM IST

नईम खान याची गोळ्या झाडून हत्या

भंडारा Naeem Khan Murder: भंडारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉरमुळं एकाची गोळी मारून हत्या करण्यात आलीय. मृतक नईम खान हा मोक्काचा आरोपी आहे. जुन्या वैमनस्यातून त्याची हत्या झाली असल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळं परिसरामध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.

आरोपीनं बंदुकीतून गोळ्या झाडल्या : तुमसर तालुक्यातील गोबरवाई रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वे फाटक लागले असताना तुमसर येथील रहिवासी आणि मोक्का आरोपी नईम खान त्याच्या चारचाकी गाडीमध्ये बसलेला होता. याच संधीचा फायदा घेत आरोपीने त्याच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये नईम खान आणि त्याचा एक साथीदार हे दोघेही जखमी झाले. त्या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता नईम खान याला डॉक्टरांनी मृत घोषित केलंय. तर जखमीवर सध्या उपचार सुरू आहे. (bhandara crime)

तुमसर तालुका गँगवारसाठी प्रसिद्ध : जखमीची सध्या माहिती मिळाली नाही. या हत्याकांडामागे कोण आरोपी आहेत, याचा सध्या पोलीस तपास घेत आहेत. घटनेची माहिती होताच जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे. तुमसर तालुका हा गँगवॉरसाठी प्रसिद्ध आहे. या अगोदरही इथे बऱ्याचदा बंदुकीतून गोळ्या झाडून किंवा धारदार शस्त्राने हत्या झालेल्या आहेत. यात पुन्हा एका हत्याकांडाची भर झालीय. (Naeem Khan Murder Mokka accused)

मोक्का म्हणजे काय : मोक्का शब्द गुन्हेगारी विश्वात सर्रास वापरला जातो. संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी राज्य सरकारनं ‘टाडा’ या कायद्याच्या धर्तीवर 1999 मध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच ‘मोक्का’ कायदा बनवलाय. या कायद्याचा आधार घेऊन शहरातील संघटीत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येतं. मोक्का लागल्यानंतर त्या आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. तसंच त्याला पाच वर्षापर्यंतची जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. खंडणी, अपहरण, हफ्ता वसुली, सुपारी देणं, खून, अंमली पदार्थांची तस्करी खंडणी, यांच्यासारखे संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो.

हेही वाचा :

  1. Pune Crime News : भिशीच्या वादातून झाली 'त्या' गुन्हेगाराची हत्या; दोन तासात आरोपींना अटक
  2. Atiq And Ashraf Ahmed Shot Dead : अतिक-अशरफची ऑन कॅमेरा गोळ्या झाडून हत्या, पत्रकार भासवून आले होते हल्लेखोर
  3. JK Police : काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना केले ठार

Last Updated : Sep 25, 2023, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.