ETV Bharat / state

जिल्हा नाही, तर प्रफुल पटेलच मोठे झाल्याने लोकांनी त्यांना नाकारले - खासदार मेंढे

जिल्ह्याचा विकास न झाल्याने यावर्षी लोकांनी प्रफुल पटेल यांना नाकारल्याचे मत नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले. निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन भविष्यातील नियोजनाविषयी खासदार मेंढे यांनी माहिती दिली.

खासदार सुनील मेंढे
author img

By

Published : May 29, 2019, 11:34 PM IST

भंडारा - माजी खासदार प्रफुल पटेल हे मागील 32 वर्षात स्वतः मोठे झाले, मात्र जिल्हा मोठा झाला नाही. जिल्ह्याचा विकास न झाल्याने यावर्षी लोकांनी त्यांना नाकारल्याचे मत नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे मंगळवारी प्रफुल पटेल आणि नाना पटोले या दोन्ही नेत्यांनी भंडाऱ्यातील निकालावर आश्चर्य व्यक्त केले होते.

खासदार सुनील मेंढे

निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन भविष्यातील नियोजनाविषयी खासदार मेंढे यांनी माहिती दिली. माध्यमांशी बोलताना प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांविषयी यावेळी त्यांना विचारण्यात आले. त्यावर 'मागील पाच वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामे केली. त्यामुळे लोकांनी फिर एक बार मोदी सरकार असे म्हणत पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. मी स्वतःला एक लहान कार्यकर्ता असून या जिल्ह्यातील लोकांसाठी नक्कीच काही चांगल्या गोष्टी करू शकतो, हे लोकांना पटवून देऊ शकलो. म्हणूनच भंडारा गोंदियाच्या लोकांनी भरघोस मतांनी मला निवडून दिले. हे फक्त भंडाऱ्यामध्येच झाले नाही. तर ज्या ज्या पोट निवडणुकीत आम्ही हरलो, त्या सर्व पोट निवडणुकीत आम्ही भरघोस मताधिक्याने जिंकल्याचेही ते म्हणाले.

मी दोन्ही जिल्ह्यात फिरलो, तेव्हा कुठेही भाजपविरुद्ध वातावरण दिसत नव्हते. व्यापाऱ्यांमध्ये ही भाजपविरुद्ध कुठलीही नाराजी दिसली नाही. त्यामुळे भाजपविरुद्ध वातावरण असूनही भंडारा-गोंदियाचे भाजपचे उमेदवार एवढ्या मतानी निवडून कसे आले, हे निकाल आश्चर्यचकित करणारे आणि संशोधनाचा विषय आहेत, असा आरोप प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांनी केला. यामध्ये अजिबात तथ्य नाही.

प्रफुल पटेल यांनी 32 वर्ष दोन्ही जिल्ह्यावर राज्य केले. या काळात त्यांनी स्वतःचा विकास करून घेतला. स्वतः मोठे झाले, मात्र जिल्ह्याचा विकास खुंटला. जिल्हा मोठा झाला नाही. त्यामुळे लोकांना याची जाणीव असल्याने या निवडणुकीत भंडारा-गोंदियाच्या लोकांनी त्यांना नाकारले. आता तरी त्यांनी सत्यता स्वीकारावी, दोन्ही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाऊन लोकांची समस्या जाणून घ्यावी. तरच भविष्यात त्यांना त्याचा फायदा होऊ शकेल, असा टोलाही यावेळी सुनील मेंढे यांनी प्रफुल पटेल यांना लगावला.

Intro:ANC : भंडारा-गोंदिया चे माजी खासदार प्रफुल पटेल हे मागील 32 वर्षात स्वतः मोठे झाले, मात्र जिल्हा मोठा झाला नाही जिल्ह्याचा विकास झाला नाही त्यामुळे यावर्षी लोकांनी त्यांना नाकारले असे मत नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले आहे, मंगळवारी प्रफुल पटेल आणि नाना पटोले या दोन्ही नेत्यांनी भंडारा तील निकालावर आश्चर्य व्यक्त केले होते याविषयी सुनील मेंढे यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Body:निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन भविष्यातील नियोजन विषयी त्यांनी माहिती दिली माध्यमांशी बोलताना प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांविषयी विषयी विचारले असता त्यांनी सांगितले की मागील पाच वर्षांमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामे केली त्यामुळे लोकांनी फिर एक बार मोदी सरकार असं म्हणत पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास दाखवत संपूर्ण देशात मताधिक्क्याने भाजपाला निवडून दिले, मी स्वतःला एक लहान कार्यकर्ता असून या जिल्ह्यातील लोकणासाठी नक्कीच काही चांगल्या गोष्टी करू शकतो हे लोकांना पाठवून देऊ शकलो आणि म्हणूनच भंडारा गोंदिया च्या लोकांनी भरघोष मतांनी मला निवडून दिले. हे फक्त भंडारा मध्येच झाले नाही तर ज्या ज्या पोट निवडणुकीत आम्ही हरलो त्या सर्व पोट निवडणुकीत आम्ही भरघोष मताधिक्याने जिंकलो

भंडारा विषय सांगायचंय तर मी स्वतः दोन्ही जिल्ह्यात फिरलो तेव्हा कुठेही भारताविरुद्ध वातावरण दिसत नव्हतं एवढेच काय तर व्यापाऱ्यांमध्ये ही भाजपा विरुद्ध कुठलीही नाराजी दिसली नाही त्यामुळे भाजपा विरुद्ध वातावरण असूनही भंडारा-गोंदिया चे भाजपाचे उमेदवार एवढ्या मतानी निवडून कसे आले हे निकाल आश्चर्यचकित करणारे आणि संशोधनाचा विषय आहेत असा आरोप प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांनी केला यामध्ये अजिबात तथ्य नाही.
प्रफुल पटेल यांनी स्वतः 32 वर्ष दोन्ही जिल्ह्यावर राज्य केले या काळात त्यांनी स्वतःचा विकास करून घेतला स्वतः मोठे झाले मात्र जिल्ह्याचा विकास खुंटला जिल्हा मोठा झाला नाही त्यामुळे लोकांना याची जाणीव असल्याने या निवडणुकीत भंडारा-गोंदिया च्या लोकांनी त्यांना नाकारले आतातरी त्यांनी सत्यता स्वीकारावी दोन्ही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाऊन लोकांची समस्या जाणून घ्यावी तरच भविष्यात त्यांना त्याचा फायदा होऊ शकेल असा टोला यावेळी सुनील मेंढे यांनी प्रफुल पटेल यांना लगावला.
बाईट : सुनील मेंढे, खासदार, भंडारा गोंदिया

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.