ETV Bharat / state

ज्येष्ठ नागरिकांना बसचे स्मार्टकार्ड पाहिजे असल्यास घ्यावा लागेल मोबाईल - state transport bus

राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये 50 टक्के सवलत हवी असल्यास त्यांनी आधी मोबाईल घ्यावा लागणार आहे. मोबाईल असेल तरच स्मार्ट कार्ड बनेल आणि स्मार्ट कार्ड असेल तरच तिकीटवर 50 टक्के सवलत मिळेल, अशा शासनाच्या विचित्र नियमामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कार्ड मिळाल्यास बसमध्ये मोफत प्रवास करायला मिळणार, असा चुकीचा प्रचार ग्रामीण भागात झाल्याने कार्ड बनवण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना बसचे स्मार्टकार्ड पाहिजे असल्यास घ्यावा लागेल मोबाईल
author img

By

Published : Jul 24, 2019, 9:42 PM IST

भंडारा - राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये 50 टक्के सवलत हवी असल्यास त्यांनी पहिले मोबाईल घ्यावे लागणार आहे. मोबाईल असेल तरच स्मार्ट कार्ड बनेल आणि स्मार्ट कार्ड असेल तरच तिकीटवर 50 टक्के सवलत मिळेल अशा शासनाच्या विचित्र नियमामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कार्ड मिळाल्यास बसमध्ये मोफत प्रवास करायला मिळणार, असा चुकीचा प्रचार ग्रामीण भागात झाल्याने कार्ड बनवण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना बसचे स्मार्टकार्ड पाहिजे असल्यास घ्यावा लागेल मोबाईल

महाराष्ट्र शासनाने मार्च महिन्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिकांना बसतिकीटावर 50 % सवलत मिळवण्यासाठी आधार कार्ड ऐवजी वेगळे स्मार्टकार्ड बनवणे बंधनकारक आहे. या कार्डवर वर्षाकाठी चार हजार किमी प्रवास सवलतीच्या दरात करता येईल. यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी बस स्थानकावर जाऊन स्वतःचे आधार कार्ड, मतदान कार्ड दाखवून नवीन स्मार्ट कार्ड बनवून घ्यावे लागेल.

हे स्मार्ट कार्ड बनवताना प्रत्येकाचा एक ओटीपी (वन टाईम पासवर्ड) जनरेट होतो. हा ओटीपी 130 सेकंदात भरावयाचा असतो. प्रत्येक ओटीपीसाठी केवळ एकाच मोबाईल नंबरचा उपयोग केला जाऊ शकतो. ग्रामीण भागातील बहुतांश घरी एकच मोबाईल असतो. अशावेळी फक्त एका व्यक्तीचे कार्ड बनवले जाऊ शकते. बऱ्याच निराधार किंवा कुटुंबापासून दूर राहणाऱ्या वृद्धंकडे मोबाईल नसतोही. अशा सर्वांना आल्यापावली परत जावे लागत आहे. याविषयी अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनीही ही अडचण होत असल्याचे मान्य केले आहे. याविषयी वरिष्ठांना तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. स्मार्ट कार्ड हवे असेल तर मोबाईल असावाच हा विचित्र नियम म्हणजे शासनाचा गरीब ज्येष्ठ नागरिकांची थट्टा करण्याचा प्रकार आहे. मोबाईलची ही अट शिथिल करून तालुका पातळीवर शासनाने हे स्मार्ट कार्ड बनवावे आणि खासगी एजंटकडून होणारी लूट थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे..

१ जानेवारी 2020 पासून स्मार्ट कार्ड नसल्यास वृद्धांना प्रवासभाड्यावर 50 टक्के सवलत मिळणार नाही.स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी भंडारा येथे बस स्थानकावर एकच कक्ष असून येथूनच विद्यार्थ्यांचा मासिक पासही बनविला जातो. त्यामुळे, इथे विद्यार्थ्यांची आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कार्ड लवकर मिळावे यासाठी खाजगी लोकांना हे कार्ड बनविण्याचे काम दिले गेले आहे. ज्या कार्ड साठी बस स्थानकावर 50 रुपये घेतले जातात त्याच कार्ड साठी खाजगी ठिकाणी 90 ते 100 रुपये घेतले जातात. अशाप्रकारे स्मार्ट कार्डच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांची सर्रास लूट सुरू आहे.

Intro:Anc : ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये 50 टक्के सवलत हवी असल्यास त्यांना पहिले मोबाईल घ्यावे लागणार आहे कारण मोबाईल असेल तरच स्मार्ट कार्ड बनेल आणि स्मार्ट कार्ड असेल तर तिकीटवर 50 टक्के सवलत मिळणार आहे शासनाच्या या विचित्र नियमामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे एवढेच नाही तर कार्ड मिळाल्यास बस मध्ये मोफत प्रवास मिळणार असा चुकीचा प्रचार ग्रामीण भागात केला गेल्याने कार्ड बनवण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Body:महाराष्ट्र शासनाने मार्च महिन्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन निर्णय घेतला या निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिकांना बस मध्ये तिकीटवर 50 % सवलत मिळविण्यासाठी आधार कार्ड ऐवजी वेगळे स्मार्टकार्ड बनवावे लागतील या कार्डवर वर्षाकाठी चार हजार किमी अंतर पार करता येईल यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी बस स्थानकावर जाऊन स्वतःचे आधार कार्ड, मतदान कार्ड दाखवून नवीन स्मार्ट कार्ड बनवून घ्यावे. या स्मार्ट कार्डची घोषणा झाल्यानंतर जिल्हाभरातून जेष्ठ नागरिक सकाळी 9 वाजेपासून रांगेत उभे राहतात मात्र जवळपास 30% लोकांना खाली हाताने परत जावे लागते कारण त्यांच्याकडे स्वतःचा मोबाईल नसतो.

हा स्मार्ट कार्ड बनवताना प्रत्येकाचा एक ओटीपी जनरेट होतो आणि हा ओटीपी 130 सेकंदात भरावयाचा असतो प्रत्येक ओटीपी साठी केवळ एकच मोबाईल नंबरचा उपयोग केला जाऊ शकतो त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश घरी एक पती कडेच मोबाईल असतो त्यामुळे पत्नीचा कार्ड बनत नाही तर बऱ्याच निराधार किंवा कुटुंबापासून दूर राहणाऱ्या वृद्ध महिलांकडे ही मोबाईल नसतो या सर्वांना आल्यापावली परत जावे लागत आहे. याविषयी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनीही ही अडचण होत असल्याचे मान्य केले आणि या विषयी वरिष्ठांना तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.
31 डिसेंबर पर्यंत हे स्मार्ट कार्ड प्रत्येकांनी बनवून घ्यायचे आहेत तोपर्यंत आधार कार्डवर 50 टक्के सवलत मिळेल मात्र एक जानेवारी 2020 पासून स्मार्ट कार्ड वरच 50% सवलत मिळेल.

सध्या हे स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी भंडारा येथे बस स्थानकावर एकच कक्ष असून इथूनच विद्यार्थ्यांची मासिक पासही बनविल्या जाते त्यामुळे इथे विद्यार्थ्यांची आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते यावर उपाय शोधत खाजगी लोकांना हे कार्ड बनविण्याचे काम दिले गेले आहे ज्या कार्ड साठी बस स्थानकावर 50 रुपये घेतले जातात त्याच कार्ड साठी खाजगी ठिकाणी 90 ते 100 रुपये घेतले जातात म्हणजेच स्मार्ट कार्ड च्या नावाने ज्येष्ठ नागरिकांची सर्रास लूट सुरू आहे स्मार्ट कार्ड हवा असेल तर मोबाईल असावाच हा विचित्र नियम म्हणजे शासनाचा गरीब ज्येष्ठ नागरिकांची थट्टा करण्याचा प्रकार आहे.
मोबाईलची ही अट शिथिल करून तालुका पातळीवर शासनाने हे स्मार्ट कार्ड बनवावे आणि खाजगी लोकांकडून होणारी लूट थांबवावी तरच हे स्मार्ट कार्ड खऱ्या अर्थाने स्मार्ट कार्ड ठरेल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.