ETV Bharat / state

येत्या साडेतीन वर्षांत पूर्ण होईल गोसेखुर्द धरण - जलसंपदा मंत्री

सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणाचे काम वेगाने सुरू असून येत्या तीन ते साडेतीन वर्षात धरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वर्तवली आहे.

जयंत पाटील व अन्य
जयंत पाटील व अन्य
author img

By

Published : Jan 30, 2021, 6:57 PM IST

Updated : Jan 30, 2021, 7:40 PM IST

भंडारा - सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणाचे काम सुरू आहे. येत्या तीन ते साडेतीन वर्षांमध्ये गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वर्तवली आहे.

बोलताना मंत्री पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद सभेसाठी ते भंडारा येथे आले होते. त्यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्न उत्तर देताना ते म्हणाले, गोसे प्रकल्पातील सर्वाधिक प्रश्न म्हणजे धरणग्रस्त लोकांचे पुनर्वसन आणि भूसंपादन आहे. त्यामुळे हा प्रश्न शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावण्यासाठी नियोजन केले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

त्यांच्या दौऱ्याबाबत विचारणा केल्यास ते म्हणाले, राज्यात सत्ता असल्याने सामान्य नागरिकांच्या तसेच पक्षातील कार्यकर्त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्यासाठी ही संवाद यात्रा सुरू केली आहे. भंडारा येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर तुमसर विधानसभा क्षेत्र त्यानंतर तिरोडा व गोंदिया, असा दौरा असल्याचेही ते म्हणाले.

हेही वचा - लागोपाठ दुसऱ्यांदा कुक्कुटपालन व्यवसायिक आर्थिक संकटात

Last Updated : Jan 30, 2021, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.