भंडारा - दिवाळीनंतर पूर्व विदर्भात साजरा केल्या जाणाऱ्या 'मंडई' या ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या सणावर या वर्षी कोरोनाचे सावट दिसत आहे. भंडारा जिल्ह्यातही दरवर्षी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. मात्र, यावर्षी काही गावात ही मंडई साजरी झाली नाही, तर ज्या गावात मंडईचे आयोजन केले गेले तिथे लोकांची उपस्थिती 25 टक्के होती.
पूर्व विदर्भातील सर्वात मोठ्या 'मंडई' सणावर यंदा कोरोनाचे सावट - मंडई उत्सव भंडारा
भंडारा जिल्ह्यात दरवर्षी मंडई उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. मात्र, यावर्षी काही गावात ही मंडई साजरी झाली नाही, तर ज्या गावात मंडईचे आयोजन केले गेले तिथे लोकांची उपस्थिती जवळपास 25 टक्केच होती.
भंडारा
भंडारा - दिवाळीनंतर पूर्व विदर्भात साजरा केल्या जाणाऱ्या 'मंडई' या ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या सणावर या वर्षी कोरोनाचे सावट दिसत आहे. भंडारा जिल्ह्यातही दरवर्षी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. मात्र, यावर्षी काही गावात ही मंडई साजरी झाली नाही, तर ज्या गावात मंडईचे आयोजन केले गेले तिथे लोकांची उपस्थिती 25 टक्के होती.
शेतकरी वर्षभर शेतीत कष्ट करीत असतो. त्याला आठवडी सुट्टी असते, ना त्याला पावसाची किंवा थंडीची, उन्हाची चिंता असते. त्याला काळजी असते ती फक्त शेतीत पिक घेण्याची. त्यामुळे विश्रांतीचे क्षण त्याच्या वाट्याला बहुदा कमी येतात. मात्र, याच शेतकऱ्यांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि विश्रांतीचा एक दिवस म्हणजे गावातील मंडई. या मंडईची शेतकरी वर्षभर मोठ्या आतूरतेने वाट पाहत असतात. ज्या दिवशी गावात मंडई असते, त्यादिवशी गाव संपूर्ण सजलेला असतो. शेतकरी शेतातील काम ठेवून हा उत्सव साजरा करण्यासाठी तयार होतात. दिवसभर सुरू राहणाऱ्या या उत्सवात लोककलेची ही जपणूक केली जाते. दंडार, लावणी आणि तमाशा हे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम कलाकार दिवसा सादर करतात तर रात्री नाटक असते. हे पाहण्यासाठी लहान मंडळींपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सर्वजण मोठ्या आवडीने उपस्थित असतात.
नवीन नाते जोडण्यासाठी आणि लग्न होऊन बाहेर गावी गेलेल्या बहिणीसाठी हा हक्काचा दिवस
मंडई या दिवसाची केवळ शेतकरीच नाही तर बहिणीसुद्धा वाट पाहतात. लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या बहिणींना मंडईच्या निमित्ताने त्यांच्या गावी परत यायला मिळते. या मंडईनिमित्त नवीन नाते, लग्नबंधन जोडले जातात. तसेच कामानिमित्त घराबाहेर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला घरी परत येण्यासाठी हा हक्काचा दिवस असतो. प्रत्येक घरी या दिवशी पाहुणेमंडळींची रेलचेल सुरू असते.
यावर्षी मात्र मंडईवर कोरोनाचा सावट
मंडईच्या दिवशी संपूर्ण गावात विविध दुकाने थाटली जातात. घरगुती उपयोगाच्या वस्तू असतील, महिलांच्या प्रसाधनाची वस्तू, खाण्याच्या वस्तू, खेळणी असतील यांची दुकाने सजवली जातात आणि यामधून लाखो रुपयांची उलाढाल होते. यावर्षी दुकाने लागली खरी, मात्र कोरोनामुळे नागरिकांनी मंडईकडे पाठ फिरवल्यामुळे दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसले.