ETV Bharat / state

'जहा ना..ना वहा जाना', उद्घाटन कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा नेत्यांना विसर - कोरोना दक्षता

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रयत्नाने दाभा येथील दुग्ध भुकटी प्रकल्प शनिवारपासून पुन्हा सुरू करण्यात आला. यावेळी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी नाना पटोले हे गाडीतून उतरून फीत कापण्यासाठी समोर जाताच उपस्थित असलेली सर्व नेतेमंडळी कोरोना आणि सोशल डिस्टनसिंग पार विसरून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.

जहा नाना वहा जाना
जहा नाना वहा जाना
author img

By

Published : Apr 5, 2020, 9:05 AM IST

Updated : Apr 5, 2020, 10:49 AM IST

भंडारा - येथे शनिवारी एक कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, दुग्ध विकास मंत्री सुनील केदारही उपस्थित होते. तसेच आजी-माजी आमदार, दूध संघाचे, बँकेचे अध्यक्ष आणि इतर नेतेही उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ठेवल्या जाणाऱ्या सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला गेला.

दाभा येथील दुग्ध भुकटी प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात सोशल डिस्टनसिंगचा नेत्यांना विसर

दाभा येथील दुग्ध भुकटी प्रकल्प शनिवारपासून पुन्हा सुरू करण्यात आला. दीड वर्षांपासून हे केंद्र पूर्णपणे बंद होते, विधानसभा अध्यक्ष यांच्या प्रयत्नाने हे केंद्र पुन्हा सुरू झाले आणि म्हणून त्यांच्या हस्ते फीत कापून एक औपचारिकता पार पाडली गेली. त्यांच्या सह दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे सुद्धा आले होते. विधानसभा अध्यक्ष येणार म्हटल्यावर दुग्ध संघाचे संचालक मंडळ, आजी माजी आमदार, काही इतर नेते मंडळी पोहचले. दरम्यान, नाना पटोले हे गाडीतून उतरून फीत कापण्यासाठी समोर जाताच तिथे उपस्थित सर्व नेतेमंडळी कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंग पार विसरून गेले. मग काय, 'जहाँ ना ना वहा जाना' असे करत नाना पटोले आणि सुनील केदार जिथे-जिथे फिरले नेत्यांचा जत्ता त्यांच्या मागेमागे फिरू लागला. शेवटी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सोशल डिस्टनसिंग का पाळले गेले नाही असे विचारताच, काहीजण क्षणभर विचलित झाले. मात्र, आपल्या अनुभवाची चुनक दाखवत लगेच 'आम्ही कोणाशी हात मिळविला नाही' असे उत्तर दिले.

याच सोशल डिस्टनसिंगसाठी देशात सर्वात अगोदर महाराष्ट्राने विधानसभा स्थगित केली होती. खरतर लॉक डाऊनच्या काळात उद्धघाटनाची निवड औपचारिकता न करता हे उद्धाटन लॉक डाऊन संपल्यावरही केले जाऊ शकत होते. मात्र, असे न केल्याने जमावबंदी आणि सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे फज्जा उडविला गेला.

Last Updated : Apr 5, 2020, 10:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.