ETV Bharat / state

तब्बल 72 वर्षानंतर कान्हळगाव ग्रामपंचायतीला मिळाला अनुसूचित प्रवर्गातील सरपंच - ग्रामपंचायत निवडणूक लेटेस्ट न्यूज भंडारा

जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव, सिरसोली या ग्रामपंचायतीच्या निर्मितीनंतर प्रथमच तब्बल 72 वर्षांनी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील व्यक्तीला सरपंच होण्याचा मान मिळाला आहे. जागेश्वर मेश्राम असे सरपंचपदी विराजमान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तब्बल 72 वर्षानंतर मिळाला अनुसूचित प्रवर्गातील सरपंच

author img

By

Published : Feb 15, 2021, 6:51 PM IST

भंडारा - जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव, सिरसोली या ग्रामपंचायतीच्या निर्मितीनंतर प्रथमच तब्बल 72 वर्षांनी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील व्यक्तीला सरपंच होण्याचा मान मिळाला आहे. जागेश्वर मेश्राम असे सरपंचपदी विराजमान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पहिल्यांदाच अनुसूचित जागेसाठी आरक्षण

जागेश्वर मेश्राम हे कान्हाळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले अनुसूचित जाती प्रवर्गातील एकमेव सदस्य आहेत. मात्र आरक्षण नसल्याने आजपर्यंत त्या गावात अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती सरपंच होवू शकली नाही, ही बाब जागेश्वर यांना लक्षात होती. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीपूर्वी मेश्राम यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना ही बाब लक्षात आणून दिली. अधिकाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेत कान्हळगाव हे गाव तब्बल 72 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अनुसुचित जातीसाठी राखीव केले. या ग्रामपंचायतमध्ये जागेश्वर मेश्राम हे या प्रवर्गामधून एकमेव निवडून आले असल्याने, सर्वमताने सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार गावकरी होते. गुलाल उधळून जागेश्वर मेश्राम यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

तब्बल 72 वर्षानंतर मिळाला अनुसूचित प्रवर्गातील सरपंच

1948 मध्ये झाली ग्रामपंचायतीची स्थापना

कान्हळगाव ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत आणखी दोन गावे सिरसोली व पिंपळगाव अशी तीन गावे मिळून बनलेली आहे. 2 नोव्हेंबर 1948 साली या ग्रामपंचायतीची स्थापना झाली. 1948 ते 2019 या दरम्यान 11 जण कान्हळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर विराजमान झाले.
यात तीन महिला व आठ पुरुष सरपंचांचा समावेश आहे. 1948 ते 2021 या 72 वर्षांच्या कालखंडात अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील एकही व्यक्ती कान्हळगावात सरपंच झालेला नव्हता. आरक्षणामुळे सात दशकानंतर पहिल्यांदाच जागेश्वर मेश्राम यांच्या रुपाने अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील व्यक्ती कान्हळगावचे प्रथम नागरिक म्हणून गावाचे नेतृत्व करणार आहेत.

आरक्षणामुळेच मिळाली संधी

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेकवेळा अनुसूचित प्रवर्गातील नागरिक निवडूण आले, मात्र आरक्षण नसल्यामुळे त्यांना सरपंच बनता आले नाही, संविधानाने दिलेल्या आरक्षणाचा फायदा मला झाला असून, या पदाचा गावाच्या विकासासाठी उपयोग करणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच जागेश्वर मेश्राम यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.