ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची आकडेवारी नक्की किती? - भंडारा कोरोना अपडेट

भंडाऱ्यात रविवारी ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र प्रत्यक्षात रविवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १० जणांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे आरोग्य विभागाच्या दैनंदिन कोरोना अहवालात केवळ सहाच मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन कोरोनामुळे बळी गेलेल्यांची आकडेवारी लपवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

corona death report bhandara
मृत्यूच्या आकडेवारीत दिशाभूल
author img

By

Published : Sep 14, 2020, 12:50 PM IST

भंडारा - शहार व जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. तसेच या महामारीने मृतांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. आरोग्य विभागाने पाठविलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये रविवारी मृतांची संख्या 00 दाखविली आहे. माध्यमांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर काही वेळानंतर 06 मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र प्रत्येक्षात घाटावर 10 मृतदेह जाळण्यात आले आहेत. त्यामुळे नेमका किती लोकांचा मृत्यू झाला हे समजू शकले नाही. या सर्व प्रकारानंतर आरोग्य विभाग आकडेवारी लपवीत तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

00 आकडेवारी ही चुकीने झालेला प्रकार-

मागच्या तीन दिवसांमध्ये 18 लोकांचा मृत्यू झाला असला तरी आरोग्य प्रशासनाच्या अहवालामध्ये तीन दिवसात फक्त 12 लोकांचा मृत्यू झाले असल्याचे दाखण्यात येत आहे. त्यातही रविवारी पाहिले 00 मृत्यू दाखविले आणि आक्षेपानंतर रविवारी 06 मृत्यू झाल्याचे सांगितले. याविषयी जिल्हधिकाऱ्यांना माहिती दिली असता, त्यांनी स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक यांना फोन करून विचारणा केली. त्यानंतर सकाळी आठ ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजपर्यंतची आकडेवारी अहवालात नमूद होते. त्यामुळे आकडेवारीत फरक दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र रविवारी 00 आकडेवारी का दाखविली? असे विचारले असता, ती मानवी चूक असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी मात्र या विषयी चौकशी करू आणि ज्यांनी ही मोठी चूक केली त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

सप्टेंबर महिन्यापासून भंडारा जिल्ह्यत रुग्णांच्या संख्येत आणि मृताच्या संख्येय अचानक वाढ झाली आहे. रविवारी पुन्हा 180 व्यक्ती कोरोना बाधित निघाले तर, सकाळी 9 वाजेपर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, एवढे असल्यावरही सायंकाळी आरोग्य यंत्रणेकडून मिळणाऱ्या मेडिकल प्रेस नोट मध्ये मृतांचा आकडा 00 दाखविण्यात आला. त्यानंतर दैनदिन कोरोना अहवालात 6 लोकांचा मृत्यू दाखविण्यात आला. तरीही २ मृतांची नोंद कमीच दाखविण्यात आली. तसेच दररोज कुठल्या तालुक्यातील व्यक्ती मृत्यू पावला, याची माहितीही देण्यात आलेली नाही.

कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यास आरोग्य विभागाकडून अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यानुसार रविवारी प्रत्यक्षात 10 लोकांना कोरोना घाटावर अग्नी देण्यात आले. मग प्रशासनाकडून अहवालात केवळ सहाच मृत्यू दर्शविण्यात आले. याचा अर्थ, अंत्यविधी झालेल्या संख्येनुसार ४ मृताची नोंद अहवालात करण्यात आली की नाही, याची सविस्तर माहिती प्रशासनाकडून मिळालेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे नेमके चालले तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढ्या गंभीर विषयावर जिल्हाधिकारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.