ETV Bharat / state

भंडाऱ्यात कालव्यावरील १०० वृक्षांची अवैध कत्तल, तक्रार करूनही कार्यवाही नाही - दोषी

नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पातील पाणी भंडारा जिल्ह्यातील काही गावांना मिळावे, याकरिता कालवे तयार करण्यात आले आहेत.

वृक्षांची अवैध कत्तल केल्यावर पडलेली झाडे
author img

By

Published : Jul 7, 2019, 1:06 PM IST

भंडारा - येथील मोहाडी तालुक्यात पेंच प्रकल्पातील कालव्यावरील तब्बल १०० झाडांची अवैध कत्तल करण्यात आली आहे. मात्र, तक्रार देऊनही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांनीच झाडे कापली तर नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. या अवैध वृक्षतोडीने शासनाच्या 33 कोटी वृक्ष लावण्याच्या स्वप्नाला अधिकारी काळिमा फासत आहेत.

भंडाऱ्यात कालव्या वरील १०० वृक्षांची अवैध कत्तल; तक्रार करूनही कार्यवाही नाही

नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पातील पाणी भंडारा जिल्ह्यातील काही गावांना मिळावे, त्याकरिता कालवे तयार करण्यात आले आहेत. या कालव्यावर हजारोंच्या संख्येने झाडे आहेत. मात्र, ही झाडे चोरीच्या मार्गाने तोडली जात आहेत. पांढराबोडी ते सीतेपार या गावावरून पेंच प्रकल्पातील कालवे गेले असून या कालव्यांवर १०० वर वेगवेगळ्या जातीची मोठी झाडे होते. ती झाडे आता नाहीशी झाली आहेत.

शासनातर्फे कोणतीही लिलाव प्रक्रिया न करता ही अवैध वृक्षतोड करण्यात आली आहे. कांद्री पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष गजानन झंझाड यांनी या कालव्यावरील झाडे कापण्यात अली असल्याची तक्रार अधिकाऱ्यांना दिली आहे. मात्र, तरीही अधिकारी त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई केली नाही. त्याउलट प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.

ही झाडे जवळपास 50 वर्षांपेक्षा जास्त आहेत. त्यांना तोडण्याची काहीच आवश्यकता नव्हती. मात्र, तरीही ही झाडे तोडल्या गेली. त्यामुळे, या झाडांची कटाई अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाली असावी अशा संशय या ठिकाणी उपस्थित झाला आहे. झाडे हे पर्यावरणाला पूरक ठरतात मात्र तरीही झाडांची अवैध वृक्षतोड करण्यात आल्याने, अशा दोषी अधिकारी व कटाई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

१ जुलैपासून ३० जुलैपर्यंत शासन वृक्षारोपण कार्यक्रम राबविणार आहे. 33 कोटी वृक्ष लागवडीचे स्वप्न महाराष्ट्र शासनाचे आहे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. आजपर्यंत जंगलाची आणि इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला. हा समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र शासन वृक्षांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे. शासन एकीकडे वृक्ष वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे काही स्वार्थी लोक आणि अधिकारी शासनाच्या संकल्पावर पाणी सोडत आहेत. अशा भ्रष्ट लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.

Intro:Anc : मोहाडी तालुक्यात येत असलेल्या पेंच प्रकल्पातील कालव्यावरील १०० झाडांची अवैध कत्तल करण्यात आली असून तक्रार देऊनही कारवाई करण्यात आली नसल्याने ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांनीच झाडे कापली तर नाही ना अशा सवाल उपस्थित होत आहे. या अवैध वृक्ष कटाईने शासनाचे 33 कोटी वृक्ष लावण्याच्या स्वप्नाला अधिकारी काळिमा फासत आहेत. Body: नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पातील पाणी हा भंडारा जिल्ह्यातील काही गावाना मिळावा त्याकरिता कालवे तयार करण्यात आले आहेत, व याच कालव्यावर हजारोच्या संख्येने झाडे आहेत, मात्र हे झाडे चोरीच्या मार्गाने तोडली जात आहेत, पांढराबोडी ते सीतेपार या गावावरून पेंच प्रकल्पातील कालवे गेले असून या कालव्यावर १०० च्या वर वेगवेगळ्या जातीचे मोठ मोठे झाडे होते, मात्र ते झाडे आता नाहीसे झाली आहेत. शासनातर्फे कोणतीही लिलाव प्रक्रिया न करता या झाडांची अवैध कटाई करण्यात आली आहे. कांद्री पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष गजानन झंझाड यांनी या कालव्यावरील झाडे कापण्यात अली असल्याची तक्रार अधिकाऱ्यांना दिली असून सुद्धा अधिकारी त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करत नसून प्रकरण दडपण्याचा प्रयन्त करीत आहेत, जवळपास 50 वर्षा पेक्षा जास्त जुनी ही झाडे तोडण्याची सध्या तरी कोणतीही गरज नोव्ह्ती मात्र तरीही ही झाडे तोडल्या गेली. या विषयी आम्ही सुद्धा अधिकाऱ्यांशी संपर्क साधले असताना सुद्धा अधिकऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत, त्यामुळे या झाडांची कटाई अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाली असावी अशा संशय या ठिकाणि उपस्थित होत आहे, मात्र झाडे हे पर्यावरणाला पूरक ठरत असून याच झाडांची कटाई करण्यात आली आहे, अशा दोषी अधिकारी व कटाई करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
1 जुलै पासून 30 जुलै पर्यंत वृक्षारोपण कार्यक्रम राबविणार आहे, 33 कोटी वृक्ष लागवडीचे स्वप्न महाराष्ट्र शासनाचे आहे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. जंगलाची आणि इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली, त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला हा समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र शासन वृक्षांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे. शासन एकीकडे वृक्ष वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे काही स्वार्थी लोक आणि अधिकारी शासनाच्या सकल्पावर पाणी सोडत आहेत, अश्या भ्रष्ट लोकणावर कारवाई करावी अशी मागणी नागरीक करीत आहे.
बाईट : गजानन झंझाड, कांद्री पाणी पुरवठा समिती अध्यक्ष Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.