ETV Bharat / state

'मी भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक लढण्यास तयार' - Bhandara Gondia

मागील काही दिवसांपासून प्रफल्ल पटेल निवडणूक लढवणार नसून त्यांची पत्नी लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. शिवाय काँग्रेसचे नाना पटोलेही या जागेवरुन निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. मात्र, मी स्वतः निवडणूक लढणार असल्याचे पटेलांनी स्पष्ट करत निवडणूक न लढण्यासंदर्भातल्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आम्ही भंडारा-गोंदियासह केंद्रातही जिंकून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी वक्त केला.

प्रफुल्ल पटेल
author img

By

Published : Mar 13, 2019, 6:07 PM IST

भंडारा - मी लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहे. पक्षाने आदेश दिल्यास मी नक्की निवडणूक लढवणार असल्याचे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी दोन-तीन दिवसातच पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

प्रफुल्ल पटेल

मागील काही दिवसांपासून प्रफल्ल पटेल निवडणूक लढवणार नसून त्यांची पत्नी लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. शिवाय काँग्रेसचे नाना पटोलेही या जागेवरुन निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. मात्र, मी स्वतः निवडणूक लढणार असल्याचे पटेलांनी स्पष्ट करत निवडणूक न लढण्यासंदर्भातल्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आम्ही भंडारा-गोंदियासह केंद्रातही जिंकून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी वक्त केला.

मागच्या पाच वर्षापासून मतदार संघातील लोकांच्या मी संपर्कात आहे. मी निवडणूक लढवण्यास तयार आहे. त्यामुळे मी माघार येणार असल्याची चर्चा निरर्थक असल्याचेही ते म्हणाले. मी राज्यसभेचा सदस्य आहे. मात्र, त्या सदस्यत्वाचा मी राजीनामा देऊ शकतो. शिवाय माझी पत्नी ही निवडणूक प्रचारात मला नेहमी साथ देते. त्या प्रचार करत असेल तर त्याचा अर्थ त्या निवडणूक लढवणार आहेत असा होत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

पटेलांना चारदा लोकसभेवर पाठवले तरी ते जिल्ह्यात विकास करु शकले नाहीत, अशी टीका त्यांच्यावर विरोधकांकडून केली जाते. त्यावर ते म्हणाले, माझ्यावर टीका करणाऱ्यांनी मागील पाच वर्षात काय केले हे मला सांगावे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भंडारा-गोंदिया या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार १०० टक्के जिंकेल तसेच केंद्रातही सत्ता परिवर्तन होईल, असा विश्‍वास पटेलांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:1 to 1 with praful patel

Anc : शरद पवार प्रमाणे पटेलही निवडणुकीतून माघार घेणार असल्याच्या चर्चेला प्रफुल पटेल यांनी पूर्णविराम दिला आहे, मी निवडणूक लढविण्यास तयार आहे पक्षाने आदेश दिल्यास मी निवडणूक लढेल असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. येत्या दोन-तीन दिवसात उमेदवारांची यादी प्रसिद्ध करू. भंडारा- गोंदिया सह केंद्रातही आम्ही जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी दाखविला.

Body:लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून भंडारा-गोंदिया लोकसभेची निवडणूक 11 एप्रिलला होणार आहे मात्र अजूनही भंडारा गोंदिया लोकसभेतून कोणत्या पक्षाने उमेदवारांची नावे जाहीर केली नाही त्यातच प्रफुल पटेल भंडारा-गोंदिया निवडणूक लढणार नाहीत या चर्चेला उधाण आला होता याविषयी त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी दिपेन्द्र गोस्वामी यांनी चर्चा केली असता त्यांनी या चर्चेला पूर्णविराम देत मी निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगितले.
मागच्या पाच वर्षापासून जिल्ह्यातील लोकांशी माझा संपर्क सतत असून मला पक्षाने आदेश दिला तर भंडारा गोंदिया लोकसभेचे निवडणूक लढविण्यास मी तयार आहे त्यामुळे मी माघार घेतली ही निरर्थक चर्चा आहे. मी राज्यसभेचा सदस्य असून अजून तीन वर्ष माझे सदस्यत्व आहे त्यामुळे राज्यसभेचा राजीनामा देऊन लोकसभा लढवावी किंवा पक्षातील इतरांना संधी द्यावी हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. तसेच माझी पत्नी ही निवडणूक प्रचारात मला नेहमी साथ देते मात्र त्यांना निवडणूक लढविण्याची सध्यातरी तयारी नसल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले.
तुम्हाला चारदा संधी दिल्यानंतर ही तुम्ही काही केलं नसल्याचा आरोप होत आहे त्यावर भाष्य करताना त्यांनी सांगितलं मी काय केलं हे सत्ताधाऱ्यांनी सांगू नये त्यांनी मागील पाच वर्षात मग मुख्यमंत्री असो किंवा इतर मंत्री असो काय केलं ते सांगावे.
या लोकसभेच्या निवडणुकीत भंडारा गोंदिया या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार 100% जिंकेल तसेच केंद्रातही सत्ता परिवर्तन होईल असा विश्‍वास यावेळी प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.