ETV Bharat / state

भंडारा येथे पुरामध्ये अडकून पती-पत्नीचा मृत्यू, ५ मुले बचावली - rupchand kamble death bhandara

शनिवारी पुराचे पाणी वाढतानाचे पाहून रूपचंद कांबळे यांनी त्यांच्या पाचही मुलांना त्यांच्या नातेवाईकाकडे नेऊन सोडले. मात्र पत्नी हट्ट करून घरीच थांबली. हळूहळू पाणी वाढत असल्याने रूपचंद त्यांच्या पत्नीला आणि घरी असलेल्या शेळ्यांना परत आणण्यासाठी घरी परतले, मात्र त्यानंतर ते परत आलेच नाही.

भंडारा पती पत्नी बुडून मृत्यू
भंडारा पती पत्नी बुडून मृत्यू
author img

By

Published : Sep 1, 2020, 4:27 PM IST

भंडारा- जिल्ह्यात आलेल्या पुरात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. भंडारा-वरठी रस्त्यावरील गणेश नगरी जवळ मेहंदी पुलाला लागून असलेल्या एका घरात या पती-पत्नीचा मृतदेह आढळला. या भागात तीन दिवसांपासून पुराचे पाणी होते. आज पाणी ओसरल्यानंतर ही घटना पुढे आली.

माहिती देताना रूपचंद यांची मुलगी व नागरिक

रूपचंद सदाशिव कांबळे (वय ५५) व रत्नमाला रूपचंद कांबळे (वय ४५) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. शनिवारी आलेल्या पुरात गणेश नगरी हा भाग पूर्णत: पाण्यात बुडाला होता. जवळपास दहा किलोमीटर अंतरावर पाच ते सहा फूट पाणी साचलेले होते. कांबळे दाम्पत्य ज्या घरात राहत होते, तो भाग पुनर्वसनामध्ये गेलेला होता. मात्र, ते घर शासनातर्फे पाडण्यात आले नव्हते. त्यामुळे, कांबळे दाम्पत्यांनी आपला संसार या घरात थाटला. बरेचदा त्यांना इथून बाहेर काढण्यात आले, मात्र दरवेळेस ते पुन्हा त्या घरी येऊन राहायचे. पावसाळ्यामध्ये या घरा सभोवताल असलेल्या खोलगट भागांमध्ये पाणी साचलेले असते. त्यामुळे हा परिसर अतिशय धोकादायक होता.

शनिवारी पुराचे पाणी वाढतानाचे पाहून रूपचंद कांबळे यांनी त्यांच्या पाचही मुलांना त्यांच्या नातेवाईकाकडे नेऊन सोडले. मात्र, पत्नी हट्ट करून त्याच घरी थांबली. हळूहळू पाणी वाढत असल्याने रूपचंद त्यांच्या पत्नीला आणि घरी असलेल्या शेळ्यांना परत आणण्यासाठी घरी परतले, मात्र त्यानंतर ते परत आलेच नाही. मंगळवारी पूर ओसरल्यानंतर नागरिकांना त्या परिसरातून वास यायला लागला. नागरिकांनी त्या घरात जाऊन बघितले असता त्यांना कांबळे दांपत्य मृतावस्थेत आढळले.

हेही वाचा- भंडारा पूर: जिल्हाधिकाऱ्यांनी SDRF आणि NDRF टीमला केलं पाचारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.