भंडारा : जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही या गावात पती-पत्नीचे गळा चिरून असलेले मृतदेह आढळल्याने (Dead bodies of husband and wife found) एकच खळबळ उडाली आहे. सुशील बोरकर (वय 46 वर्षे) व सरिता बोरकर वय (42 वर्षे) असे मृतक पती-पत्नीचे नाव आहे. (Husband and wife murder Bhandara)
आतील दृष्य पाहून शेजारी हादरले - गुरुवारी संपूर्ण बोरकर कुटूंब रात्री झोपी गेले. पती-पत्नी एका रूममध्ये तर दोन मुले एका रूममध्ये झोपली होती. आज सकाळी आई-वडिलांच्या बेडरूमचा दार न उघडल्याने दुसऱ्या बेडरूममध्ये झोपली असलेली आठ वर्षांची मुलगी हिने प्रथम दरवाजा ठोकून आई-वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र आई-वडील उठत नसल्याने तिने शेजाऱ्यांना बोलविले. घरचा दरवाज्या न उघडल्यांने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला असता गळा चिरल्याने रक्तबंबाळ अवस्थेत पती-पत्नीचा मृतदेह आढळून आला.
खून की आत्महत्या, तपास सुरू - यांची माहिती गोबरवाही पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी ही हत्या वाटत असली तरी बेडरूमचे दोन्ही दार बंद असल्याने पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या तर केली नाही ना, या बाजूनेही पोलीस तपास करीत आहेत.