ETV Bharat / state

शिवभोजन थाळीचे उद्घाटन... जेवणाकडे लक्ष द्यायला पालकमंत्र्यांकडे नव्हता वेळ

महाविकास आघाडीतर्फे 'शिवभोजन थाळी' योजनेला 26 जानेवारी पासून संपूर्ण राज्यात विधीवत सुरुवात करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातही सुरुवातीला महसूल कॅन्टीन आणि जिल्हा परिषदमधील कॅन्टीनमध्ये ही योजना राबविली जाणार आहे. 26 तारखेला पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणाच्या स्थळी केवळ फलकाचे उद्घाटन करून औपचारिकता पूर्ण करत ते निघून गेले.

शिवभोजन थाळीची भंडाऱ्यात सुरुवात
शिवभोजन थाळीची भंडाऱ्यात सुरुवात
author img

By

Published : Jan 26, 2020, 4:28 PM IST

Updated : Jan 26, 2020, 5:50 PM IST

भंडारा - ग्रामीण भागातील लोकांसाठी कमी पैशात जेवण उपलब्ध व्हावे. यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने 'शिवभोजन थाळी' योजनेचा 26 जानेवारी पासून संपूर्ण राज्यात शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात दोन ठिकाणी योजनेची सुरुवात करण्यात आली. ठरल्याप्रमाणे याचे उद्घाटन पालकमंत्री विश्वजित कदम हे करणार होते. मात्र, त्यांनी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर तिथे केवळ शिवभोजन थाळी या फलकाचे उद्घाटन केले. ज्या ठिकाणी योजना सुरू करण्यात आली. त्या ठिकाणी जाऊन पाहण्याचे आणि जेवणाची चव घेण्याचे साधे औचित्य पालकमंत्र्यांनी दाखविले नाही.

भंडाऱ्यात शिवभोजन थाळीची सुरुवात

निवडणुकीच्या काळात शिवसेनेने त्यांच्या घोषणापत्रात गरीब लोकांना केवळ १० रुपयात जेवण देऊ अशी घोषणा केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि शिवसेनेने केलेल्या घोषणेला अस्तित्वात आणण्यासाठी शिवभोजन थाळी 26 जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्याची योजना ठरली.

प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन भंडारा पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला गेला.

दरम्यान, भंडारामध्ये सुरुवातीला महसूल कॅन्टीन आणि जिल्हा परिषदमधील कॅन्टीनमध्ये ही योजना राबविली जाणार आहे. 26 तारखेला पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना, राज्यात आजपासून दहा रुपयात भोजन देणारी शिवभजन योजना शासनाने सुरू केली असून भंडारा जिल्ह्यात दोन ठिकाणी योजना आजपासून सुरू झाली असल्याची घोषणा त्यांनी केली आणि या योजनेचा गोरगरीब जनतेला त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मात्र यानंतर, पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणाच्या स्थळी केवळ फलकाचे उद्घाटन करून फक्त औपचारिकता पूर्ण करत ते मोकळे झाले. त्यामुळे पालकमंत्र्यांना या शिवभोजन थाळीचे किती महत्त्व आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

हेही वाचा - साकोलीतील 'त्या' अल्पवयीन मुलीने प्रेमात नैराश्यापोटी आत्महत्या केल्याचा अंदाज; पोलीस तपास सुरू

महाराष्ट्रात कुणीही उपाशी राहू नये, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. जरी 10 रुपयात लोकांना जेवण मिळणार असेल तरी जेवणाच्या गुणवत्तेत अजिबात तडजोड केली जाणार नाही, असे सांगितले गेले. मात्र, ही शिवभोजन थाळी नेमकी कोणासाठी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कारण भंडाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी योजना सुरू केल्या गेल्या तिथे शासकीय कर्मचारी आणि अधिकारीच मोठ्या प्रमाणात येतात. आजही ही योजना सुरू झाल्यानंतर बऱ्याच मध्यमवर्गीय लोकांनी 10 रुपयात जेवणाचा आनंद घेतला. तसेच काही गरजू लोकांनी आणि विद्यार्थ्यांनीही या भोजनाचा आनंद घेतला. त्यांच्या मते ही योजना त्यांच्यासाठी अतिशय फायदेमंद ठरेल मात्र, ज्या ठिकाणी योजना सुरु केली आहे. ते लक्षात घेता भंडाऱ्यात तरी ही योजना गरिबांसाठी नाही तर अधिकारी, कर्मचारी आणि मध्यमवर्गीय यांच्यासाठी आहे, असे दिसते. मात्र, येणाऱ्या काळात शिवसेनेच्या झुणका भाकर सारखी शिवभोजनाची दुरवस्था होऊ नये एवढीच अपेक्षा.

हेही वाचा - काळ आला होता पण वेळ आली नव्हती, तुमसर तालुक्यात वाघाची दहशत

Intro:Body:Anc : ग्रामीण भागातील लोकांसाठी कमी पैशात जेवण उपलब्ध व्हावे यासाठी महाविकास आघाडी तर्फे शिवभोजन थाळीची योजनेला 26 जानेवारी पासून संपूर्ण राज्यात विधीवत सुरुवात करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील दोन ठिकाणी योजनेची सुरुवात करण्यात आली. ठरल्याप्रमाणे याचे उद्घाटन पालकमंत्री विश्वजित कदम ही करणार होते मात्र त्यांनी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर तिथेच केवळ शिवभोजन थाळी या फलकाचे उद्घाटन केले. ज्या ठिकाणी योजना सुरू केली गेली त्या ठिकाणी जाऊन पाहण्याची आणि जेवणाची चव घेण्याचे साधे औचित्य पालकमंत्र्यांनी दाखविले नाही.

निवडणुकीच्या काळात शिवसेनेने त्यांच्या घोषणापत्रात गरीब लोकांना किंवा दहा रुपयात जेवण देऊ अशी घोषणा केली होती त्यानंतर महा विकास आघाडीची स्थापना झाली आणि शिवसेनेने केलेल्या घोषणेला अस्तित्वात आणण्यासाठी शिवभोजन थाडी 26 जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्याची योजना ठरली.

भंडारा मध्ये सुरवातीला महसूल कॅन्टीन आणि जिल्हा परिषद मधील कॅन्टीन मध्ये योजना राबविला जाणार आहे 26 तारखेला पालकमंत्री यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार असल्याची घोषणा करण्यात आली मात्र पालकमंत्र्यांनी केवळ औपचारिकता पूर्ण करत ध्वजारोहणाच्या स्थळी केवळ फलकाचे उद्घाटन करून मोकळे झाले त्यामुळे पालकमंत्र्यांना याच शिवभोजन थाळीचे किती महत्त्व आहे असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

महाराष्ट्रात कुणीही उपाशी राहू नये या उद्देशाने ही योजना सुरू केली गेली जरी 10 रुपयात लोकांना जेवण मिळणार असेल तरी जीवनाच्या क्वालिटी मध्ये अजिबात तडजोड केली जाणार नाही असे सांगितले गेले. मात्र ही शिव भोजन थाळी नेमकी कोणासाठी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कारण भंडारा मध्ये ज्या ठिकाणी योजना सुरू केल्या गेल्या तिथे शासकीय कर्मचारी आणि अधिकारीच मोठ्या प्रमाणात येतात. आजही ही योजना सुरू झाल्यानंतर बऱ्याच मध्यमवर्गीय लोकांनी दहा रुपयात जेवणाचा आनंद घेतला. तसेच काही गरजू लोकांनीही आणि विद्यार्थ्यांनीही या भोजनाचा आनंद घेतला. त्यांच्या मते योजना त्यांच्यासाठी अतिशय फायदेमंद ठरेल मात्र ज्या ठिकाणी योजना सुरु केली आहे ते लक्षात घेता भंडाऱ्यात तरी योजना गरिबासाठी नाही तर अधिकारी, कर्मचारी आणि मध्यमवर्गीय यांच्यासाठी आहे असे दिसते. येणाऱ्या काळात शिवसेनेच्या झुणका भाकर सारखी शिव भोजनाची दुरावस्था होऊ नये एवढीच अपेक्षा.
बाईट : सुबोध धोटे, विद्यार्थी
अशोक कानपटे, लाभार्थी
राहुल निमजे, केंद्र चालकConclusion:
Last Updated : Jan 26, 2020, 5:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.