ETV Bharat / state

गोसे प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार; प्रशासनात खळबळ

भंडारा जिल्ह्यातील अतिमहत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या गोसे धरणाच्या भूमिपूजनाला आज ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही धरण पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेले नाही. या धरणात शेती आणि गाव गेल्याने विस्थापित झालेल्या पुनर्वसित लोकांना अजूनही त्यांच्या शेतीचा आणि घराचा योग्य मोबदला मिळालेला नाही.

गोसे प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार
author img

By

Published : Mar 27, 2019, 9:51 PM IST

भंडारा - गोसेखुर्द धरण अंतर्गत येणाऱ्या ३४ गावांतील प्रकल्पग्रस्तांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या भूमिकेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

गोसे प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार

भंडारा जिल्ह्यातील अतिमहत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या गोसे धरणाच्या भूमिपूजनाला आज ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही धरण पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेले नाही. या धरणात शेती आणि गाव गेल्याने विस्थापित झालेल्या पुनर्वसित लोकांना अजूनही त्यांच्या शेतीचा आणि घराचा योग्य मोबदला मिळालेला नाही. या गावातील लोकांनी ११ तारखेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.

नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची शेती या धरणांमध्ये गेले आहे. त्या काळात एकरी प्रत्येक २५ ते ३० हजार रुपये मोबदला देण्यात आला होता, मात्र ३० वर्षांचा कालावधी उलटला तरी धरण पूर्णत्वास आले नाही. मोबदल्याची किंमत दहापट वाढविण्यात आली मात्र शेतकऱ्यांच्या शेतीला वाढीव मोबदला देण्यात आला नाही. अनेक निवडणुका झाल्या अनेक नेते जिंकून गेले मात्र आश्वासनाची पूर्तता कुणीही केली नाही. या नेत्यांना निवडून दिले जाते, मात्र शेतकऱ्यांना आश्वासनांपलीकडे काहीही मिळत नाही. त्यामुळे अशा नेत्यांना धडा शिकवण्यासाठी गावकऱ्यांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात बहिष्काराचे हत्यार उचलले आहे.

प्रकल्पग्रस्त लोकांना वाढीव मोबदला मिळावा, ते राहत असलेल्या पुनर्वसन क्षेत्रात नागरी सुविधा मिळाव्यात, कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळावी, अशा विविध मागण्या घेऊन यापूर्वीही आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला घेराव घातला होता. आमदार कडू यांनी गोसे धरणाच्या ठिकाणी येऊन आंदोलन केले होते. या दोन्ही आंदोलनानंतर, या प्रकल्पग्रस्त लोकांच्या मागण्यांची पूर्तता करू, असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले होते, मात्र तो फक्त वेळकाढूपणा असल्याचे आता लक्षात येत आहे. गावकऱ्यांनी बहिष्काराची भूमिका घेतल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले, तसेच निवडणूक रिंगणात उतरलेले राजकीय पक्षसुद्धा या गावकर्‍यांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Intro:ANC : भंडारा जिल्ह्याच्या गोसेखुर्द धरण अंतर्गत येणाऱ्या 34 गावातील प्रकल्पग्रस्त लोकांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार करण्याची भूमिका घेतल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Body:भंडारा जिल्ह्यातील अतिमहत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या गोसे धरणाच्या भूमिपूजनाला आज तीस वर्षे पूर्ण झाली असली तरी अजूनही धरण पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला नाही एवढेच नाही तर या धरणात शेती आणि गाव गेल्याने विस्थापित झालेल्या पुनर्वसित लोकांना अजूनही त्यांच्या शेतीचे घराचे योग्य मोबदला न मिळाल्याने या 34 गावातील लोकांनी अकरा तारखेला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.
नागपूर भंडारा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धरणांमध्ये गेल्यात त्या काळात प्रत्येक 25 ते 30 हजार रुपये एकरी मोबदला देण्यात आला होता मात्र तीस वर्षाचा कालावधी उलटला तरी धरण शंभर पूर्णत्वास आला नसून धनाची किंमत दहा पट वाढविण्यात आली मात्र शेतकऱ्यांच्या शेतीला वाढीव मोबदला देण्यात आला नाही अनेक निवडणुका झाल्या अनेक नेते जिंकून गेले मात्र आश्वासनाची पूर्तता कुणीही केली नाही आपल्या मागण्यांची पूर्तता करून देतो असं सांगून त्यानंतर प्रत्येक वेळेस या नेत्यांना निवडून दिले जाते मात्र शेतकऱ्यांना आश्वासनापलीकडे काहीही मिळत नाही त्यामुळे अशा नेत्यांना धडा शिकवण्यासाठी गावकऱ्यांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात बहिष्काराचं हत्यार उचललेला आहे.
प्रकल्पग्रस्त लोकांना वाढीव मोबदला मिळावा ते राहत असलेल्या पुनर्वसन क्षेत्रात नागरी सुविधा मिळाव्यात कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळावी अशा विविध मागण्यांना घेऊन
या अगोदरही आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांचा बंगल्याला घेराव केला होता आमदार बच्चू कडू यांनी गोसे धरणाच्या ठिकाणी येऊन आंदोलन केले होते या दोन्ही आंदोलनानंतर या प्रकल्प ग्रस्त लोकांच्या मागण्यांची पूर्तता करू असे मुख्यमंत्री तर्फे सांगण्यात आले होते मात्र तू फक्त वेळकाढूपणा असल्याचा आता लक्षात येत आहे.
गावकऱ्यांनी बहिष्काराची भूमिका घेतात प्रशासन खडबडून जागा झाला तसेच निवडणूक रिंगणात उतरलेल्या राजकीय पक्ष सुद्धा या गावकर्‍यांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.
बाईट : मंगेश वंजारी, प्रहार संघटना
विनोद हुमने, गावकरी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.