ETV Bharat / state

प्रेयसीची हत्या करून फरार झालेल्या प्रियकराला तब्बल एका वर्षानंतर अटक - Assistant Inspector of Police Sushant Patil

प्रेयसीची हत्या करून फरार झालेल्या प्रियकराला तब्बल एका वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. प्रियसीने दुसऱ्या तरुणाशी संसार थाटल्याने भर रस्त्यात काठीने वार करून प्रियकराने प्रेयसीची हत्या केली होती.

अडयाळ पोलिस स्टेशन
अडयाळ पोलिस स्टेशन
author img

By

Published : Dec 11, 2020, 2:47 AM IST

भंडारा - प्रेयसीची हत्या करून फरार झालेल्या प्रियकराला तब्बल एका वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. प्रेयसीने दुसऱ्या तरुणाशी संसार थाटल्याने भर रस्त्यात काठीने वार करून प्रियकराने प्रेयसीची हत्या केली होती. त्यानंकर आरोपी फरार झाला होता. या आरोपीला पोलिसांनी तब्बल एक वर्षानंतर अटक करण्यात यश मिळविले आहे. भंडारा जिल्ह्याच्या अडयाळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मिंसी या गावात 21 डिसेंबर 2019 ला हे हात्याकांड झाले होते. आरोपी प्रियकर संदीप संजय तांडेकर वय 28 वर्ष याला छत्तिसगढ़ राज्याच्या दुर्ग येथून अटक करण्यात आली आहे.

नागपूर येथे जुडले होते प्रेम संबंध-

आरोपी संदीप तांडेकर राहणार मिंसी हा कामानिमित्त नागपूर येथे असतांना मृतक प्रेयसी (वय 20 वर्ष ) हिच्याशी प्रेम संबध जुळले. या दोघांनी नागपूर सोडून भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे आले आणि तिथेही दोघेही एकत्र राहायला लागले. मात्र त्याच दरम्यान आरोपी संदीप याला एका चोरी प्रकरणात शिक्षा ठोठावली गेली. त्यामुळे संदीपला कारागृहात जावे लागले.

प्रेयसीने थाटले दुसऱ्याशी संसार-

संदीप शिक्षा भोगण्यासाठी कारावासात गेल्यानंतर प्रेयसी संदीपच्या मिंसी या गावी आली. काही दिवसानंतर तिथे तिने दुसर्‍या एका तरुणाशी प्रेम झाल्याने त्याच्याशी संसार थाटला. जेलमधून सुटल्यावर सर्वप्रथम आपल्या प्रेयसीला भेटण्याचे संदीपने ठरविले. मात्र कारागृहातून निघाल्यानंतर त्याला प्रेयसी विषयी मिळाली.

गावात जाऊन काठीने मारहाण करून केली हत्या-

आरोपी कारागृहात गेल्यानंतर प्रेयसीचे गावातील एका व्यक्तीशी प्रेम संबंध जुळल्याने त्याच्याशी संसार थाटू लागली. याविषयी संदीप याला माहिती होताच संतापलेल्या संदीपने प्रेयसीच्या घरी जात तिला घरुन ओढत चौकात आणले. व भर रस्त्यात अतिशय निर्दयतेने तिच्या डोक्यावर काठीने वार करत तीची हत्या करत तेथून पळ काढला होता.

तब्बल एक वर्षाने पोलिसांनी केले अटक-

21 डिसेंबर 2019 रोजी हे हत्याकांड झाले. ह्या प्रकरणी अडयाळ पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद झाला. मात्र घटनेनंतर अपराधी प्रवृत्तीचा असलेल्या आरोपी संदीप याने महाराष्ट्राच्या बाहेर पलायन केले. त्याच्या विषयी गावात कोणालाही ज्यास्त माहिती नसल्याने त्याचा शोध लागत नव्हता. मात्र अड्याळ पोलिसांनी त्याचा तपास आणि शोध सतत सुरू ठेवला. त्यानंतर आरोपी छत्तीसगढ़ राज्यातील दुर्ग येथे लपुन असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी संदीपला दुर्ग येथून अटक करत अडयाळ पोलिस स्टेशनला आणले. पोलिसांच्या चिकाटीमुळे सदर आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे.

हेही वाचा- जाणून घ्या देशभरातील कोरोनाच्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी

हेही वाचा- भिवंडीत नायट्रोजन स्फोट; आणखी एकाचा मृत्यू , मृतांची संख्या 3 वर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.