ETV Bharat / state

भिलेवाडा गावात अग्नितांडव, ५ घरांसह जनावरांच्या गोठ्याला आग - animal

आगीत २ बैल आणि २ गाईंचा होरपळून मृत्यू झाला. तर घरातील साहित्य आणि शेतीचे साहित्य जळून खाक झाले.

भिलेवाड गावात लागलेली आग १
author img

By

Published : May 4, 2019, 7:59 PM IST

भंडारा - भिलेवाडा गावात गाईच्या गोठ्यासह ५ घरांना लागलेल्या आगीत ४ जनावरांचा मृत्यू झाला असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी गावकरी मदतीला धावल्याने मोठा अनर्थ टळला. आगीमुळे लाखोंच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भिलेवाडा गावात लागलेली आग

भंडारा शहारावरून ७ किमी असलेल्या भिलेवाडा गावात दुपारी अचानक भाजनदास डोळस यांच्या घरच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली. आग भडकून शेजारी राहणाऱ्या राजहंस बांडेबूचे यांच्या घराला लागली. उष्णतेमुळे आग अधिकच वाढत गेली. आग पसरून प्राणहंस बांडेबूचे, ज्ञानेश्वर बांडेबूचे, तुळशीराम खवास आणि भोजराज खवास यांच्या घरापर्यंत पोहोचली. आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आगीने रुद्र रुप धारण केल्याने, ही आग आटोक्यात येत नसल्याने भंडारानगर पालिकेच्या अग्निशामक गाडीला पाचारण करण्यात आले. २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.

आगीत २ बैल आणि २ गाईंचा होरपळून मृत्यू झाला. तर घरातील साहित्य आणि शेतीचे साहित्य जळून खाक झाल्याने भाजनदास डोळस यांचे जवळपास ५ लाखांचे, तर इतर लोकांचे जवळपास २ ते ३ लाखांचे नुकसान झाले आहे.

Intro:Anc : भिलेवाडा गावात गाईच्या गोठ्याला लागलेल्या आगीत 4 जनावरांसह 5 घरांना आग लागल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे, गावकरी मदतीला धावल्याने मोठा अनर्थ टळला आणि कुठली ही जीवित हानी झाली नसली तरी लाखोंचा नुकसान झाले आहे, आग मात्र कशामुळे लागली याचे कारण पुढे आले नाही.

Body:भंडारा शहारावरून 7 कीमी असलेल्या भिलेवाडा गावात दुपारी अचानक भाजनदास डोळस यांच्या घरच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली लाग भडकून शेजारी राहणाऱ्या राजहंस बांडेबूचे यांच्या घराला लागली उष्णतेमुळे आग अधिकच वाढत गेली ती पसरून पुढे प्राणहंस बांडेबूचे, ज्ञानेश्वर बांडेबूचे, तुळशीराम खवास भोजराज खवास यांच्या घरापर्यंत पोहचली.
आग लागल्याचे लक्षात येताच गावकरी मदतीस धावले मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचे प्रयत्न गावकऱ्यांनी सुरू केले मात्र आगीने मोठे रुद्र रूप धारण केले असल्याने ही आटोक्यात येत नोव्ह्ती शेवटी भंडारा नगर पालिकेच्या अग्नी शामक गाडीला पाचारण करण्यात आले, शेवटी 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.
सुरवातीला ज्या जनावरांच्या गोठ्यात आग लागली तिथे असलेले 2 बैल, आणि 2 गाई यांचा होरपडून जागीच मृत्यू झाला, हे घरे कवेलुचे असल्याने या आगीत घराच्या मयाली, शेतीचे साहित्य, आणि जीवनाउपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने भाजनदास डोळस यांचे जवळपास पाच लाखांचे, तर इतर लोकांचे जवळपास 2 ते 3 लाखांचा नुकसान झाले आहे, या अग्नी तांडवातील एकमेव समाधानकारक गोष्ट म्हणेज कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र घर जाळल्याने या घरातील कुटुंब उघडयावर आले आहे,
आग नेमक्या कोणत्या कारणास्तव लागली आहे आणि किती नुकसान ,आले आहे यासाठी तलाठ्याने पंचनामा केले आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.