ETV Bharat / state

उसाच्या शेतात मादी बिबट्याने दिला पिल्लाला जन्म, सुरक्षेसाठी वन विभागाकडून 14 ट्रॅप कॅमेरे - leopard cub in sugarcane farm

शेतातील सर्व ऊस कापला असून ज्या भागात हे बछडे होते, तो भाग तसाच ठेवला आहे. तेथे कॅमेरे लावण्यात आले. कॅमेऱ्यामध्ये मादी बिबट रात्री नऊनंतर तेथे आल्याचे तसेच, पिल्लांना दूध पाजून पुन्हा दुसऱ्या दिवशी निघून गेल्याचे रेकॉर्ड झाले. मादी बिबट्याच्या पंजांचे ठसेही या भागात आढळून आले.

उसाच्या शेतात मादी बिबट्याने दिला पिल्लाला जन्म, सुरक्षेसाठी वन विभागाकडून 14 ट्रॅप कॅमेरे

author img

By

Published : Mar 18, 2020, 10:46 PM IST

भंडारा - लाखनी तालुक्यात एका शेतकऱ्याच्या शेतात मादी बिबट्याने पिलांना जन्म दिला आहे. सुरुवातीला दोन बछडे आहेत, असे वन विभागाने म्हटले होते. मात्र, आता एकच पिल्लू असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आहे. यावरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. पिल्लांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने संपूर्ण परिसरात 14 ट्रॅप कॅमेरे बसवलेत. तसेच, सुरक्षेसाठी 15 कर्मचारी ठेवले आहेत. मादी पिल्लांना येथून घेऊन जाईपर्यंत वन विभागाची देखरेख राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उसाच्या शेतात मादी बिबट्याने दिला पिल्लाला जन्म, सुरक्षेसाठी वन विभागाकडून 14 ट्रॅप कॅमेरे

लाखनी तालुक्यातील उमरीझरी सह वनपरिक्षेत्रात येणाऱ्या परसटोला येथील एका शेतकऱ्याच्या शेतात 4 एकरात उसाची लागवड केली होती. मागील पाच-सहा दिवसांपासून येथे ऊस तोडणी सुरू आहे. तोडणी दरम्यान संध्याकाळच्या सुमारास मजुरांना ही लहान पिल्ले उसाच्या शेतात दिसली. काही मजुरांनी त्यांचे फोटोही काढले आणि त्याची माहिती त्यांनी शेतमालकाला दिली. शेत मालकाने वन विभागाला याची माहिती देताच वन कर्मचारी-अधिकाऱ्यांनी त्या शेतात गस्त वाढवली.

दुसऱ्या दिवशी शेतातील सर्व ऊस कापून ज्या भागात हे बछडे होते, तो भाग तसाच ठेवण्यात आला. त्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले. कॅमेऱ्यामध्ये ही मादी बिबट रात्री नऊनंतर त्या ठिकाणी आल्याचे तसेच, पिल्लांना दूध पाजून पुन्हा दुसऱ्या दिवशी निघून गेल्याचे रेकॉर्ड झाले. तसेच मादी बिबट्याच्या पंजांचे ठसेही या भागात आढळून आले.

आता या शेतात एक मचान उभारण्यात आले आहे. परिसरात 14 कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच, 15 कर्मचारी आणि मजूर यांचा 24 तास पहारा राहणार आहे. ही मादी बिबट्या तिच्या पिल्लांना येथून घेऊन जाईपर्यंत वन विभाग त्यांची पूर्ण सुरक्षा करणार आहे. 'शेतापासून काही किलोमीटर अंतरावर वनक्षेत्र आहे त्याच जंगलातून ही मादी बिबट इथे आली आली. उसाच्या मळ्यात तिला सुरक्षित वाटत असल्याने तिने बछड्याना इथेच जन्म दिला असावा,' असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, पिल्ले 2 की 1 याबाबत अद्यापही संभ्रम आहे.

हेही वाचा - #CORONA : औरंगाबादेत संशयित रुग्णांची संख्या 7, एक रुग्ण गायब

हेही वाचा - CORONA : मध्य रेल्वेकडून प्रवाशांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती, दैनंदिन प्रवासी घटले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.