ETV Bharat / state

फेल झालेल्या फडणवीस सरकारची पास होण्यासाठी 'जनादेश' यात्रा- नाना पटोले - Bhandara

संपूर्ण महाराष्ट्रात फिरून आम्ही सरकारच्या खोट्या आश्वासनाचा पर्दाफाश करू, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. काल प्रदेश काँग्रेसने अमरावतीत सुरू केलेल्या 'महापर्दाफाश' यात्रेचे आज शहरामध्ये आगमन झाले. या पार्श्वभूमीवर आज साखरकर सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हा घणाघात केला.

नाना पटोले
author img

By

Published : Aug 27, 2019, 7:49 PM IST

भंडारा- महाराष्ट्राचा मी दुप्पट विकास केला असून याविषयी जर कोणी चर्चा करायला तयार असेल तर मी तयार आहे, असे मुख्यमंत्रांनी आव्हान केले होते. त्यांचे आव्हान आम्ही स्वीकारले. मात्र, त्यांनी काढता पाय देत लोकांना भूलथापा देणारी 'जनादेश यात्रा' सुरू ठेवली. त्यामुळे त्यांच्या कामाची सत्यता नागरिकांसमोर आणण्यासाठी आम्ही 'महापर्दाफाश' यात्रेला सुरवात केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून आम्ही सरकारच्या खोट्या आश्वासनाचा पर्दाफाश करू, असे नाना पटोले यांनी सांगितले.

सरकार बद्दल आपला विरोध व्यक्त करताना काँग्रेस नेते नाना पटोले

काल प्रदेश काँग्रेस ने अमरावतीत सुरू केलेल्या 'महापर्दाफाश' यात्रेचे आज शहरामध्ये आगमन झाले. या पार्श्वभूमीवर आज साखरकर सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पटोले यांनी सदरील प्रतिक्रिया दिली. मात्र, जिल्हाध्यक्षांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका महा पर्दाफाश यात्रेला बसला. सभागृहात खुर्च्या भरतील एवढेही लोक उपस्थित नव्हते.

विकास झाला कुठे? - नाना पटोले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या 'महाजनादेश' यात्रेत सांगतात की त्यांनी महाराष्ट्राचा विकास केला. सर्व सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी विविध योजनांचा माध्यमातून मार्गी लावले. २०१४ मध्ये फडणवीस शासन आल्यानंतर दीड लाख कोटींचा कर्ज ५ लाख कोटींवर गेले आहे. मात्र विकासाच्या बाबतीत विचार केला तर, प्रत्येक विभागातील पदे खाली आहे. म्हणजे नौकर भरती बंद केली, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती बंद केली, लघू उद्दोग बंद होत आहेत, शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढले, मग विकास झाला कुठे? असा सवाल त्यांनी सभेत उपस्थित केला.

सरकारद्वारे काढलेली शेतकऱ्यांसाठीची पेन्शन योजना ही फसवी आहे. कारण शेतकऱ्यांचे पैसे २० वर्ष घेऊन त्यातूनच शेतकऱ्यांना पेन्शन देणार आहे. म्हणजे तुमचे पैसे तुम्हला देणार, पेट्रोल आणि डिझेलच्या नावाने दुष्काळ सेस घेणार. कर्जमाफीला ३ वर्ष लोटूनही शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली नाही. असे फसवे काम फडणवीस सरकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

एकत्रित लढा द्या विजय निश्चित आहे

रिजर्व बँकेतीक देशाच्या संकटाच्या वेळेस कामात येईल असा राखीव पैसाही या भाजपा शासनाने काढून घेतला आहे. अमरनाथ यात्रा थांबवून हिंदुंच्या धार्मिक भावना दुखविण्याचे महापाप या मोदी सरकारने केले आहे. मोदी शासन आल्यानंतरच गाई म्हशी कापण्याचे काम मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मोदी शासन येण्या अगोदार आपण बीफ विक्रीत १० व्या स्थानी होतो. आता आपण पहिल्या स्थानी आहोत. भाजपाने ज्या पद्धतीने लोकांना चुकीच्या गोष्टी पसरवीत आहे त्यामुळे ही लढाई मोठी आहे. मात्र काँग्रेसला मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा आहे. याची प्रचिती मला वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या सभे दरम्यान झाली आहे. तेव्हा येणाऱ्या विधानसभेसाठी तयार व्हा, एकत्रित लढा द्या विजय निश्चित आहे, असे त्यांनी सांगितले.

महा पर्दाफाश सभेत भंडारा काँग्रेस मधला वाद चव्हाट्यावर

आज झालेल्या महा पर्दाफाश सभेत भंडारा काँग्रेस मधला वाद पुन्हा समोर आला. विद्यमान जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी या यात्रेबद्दल जिल्ह्यातील बऱ्याच वरिष्ठांना आणि कार्यकर्त्यांना सांगितले नव्हते. त्याचबरोबर त्यांनी सर्व ठिकाणी आपलेच बॅनर लावले होते. एवढेच नव्हे तर, सभेच्या स्थळी मंचावर लावलेल्या बॅनरवर देखील नाना पटोले यांचे नसून गणवीर यांचे आहे, असे वाटत होते.

Intro:ANC: - महाराष्ट्राचा मी दुप्पट विकास केला असून याविषयी जर कोणी चर्चा करायला तयार असेल तर मी तयार आहे असे मुख्यमंत्रांनी आव्हान केले होते,मुख्यमंत्र्यांनी समोर समोर येऊन खुली चर्चा करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले मात्र त्यांनी काढता पाय देत लोकांना भूपथापा देणारी जनादेश यात्रा सुरू ठेवली म्हणून त्यांचा कामाची सत्यता नागरिकांच्या समोर आणण्यासाठी आम्ही महा पर्दाफाश यात्रेला सुरवात केली असून संपूर्ण महाराष्ट्रात फिरून महाराष्ट्र सरकारच्या खोट्या आश्वासनाचा पर्दाफाश करेल असे नाना पटोले सभेत सांगत आहेत. मात्र जिल्हाध्यक्षांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका महा पर्दाफाश यात्रेला बसला साखरकर सभागृहात खुर्च्या भरतील एवढेही लोक उपस्थित नोव्हतें.

Body:काल अमरावती पासून प्रदेश काँग्रेस ने सुरू केलेली महा पर्दाफाश यात्रेचे आज भंडारा मध्ये आगमन झाले, काल च्या यात्रेत काँग्रेस चे मोठे नेते होते मात्र आज भंडारा मध्ये एकटे नाना पटोले आणि स्थानिक नेते या सभेत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या महाजनादेश यात्रेत सांगतात की त्यांनी महाराष्ट्राचा विकास केला सर्व सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न, विविध योजनांचा माध्यमातून मार्गी लावले, याला उत्तर देण्यासाठी काढलेल्या महा पर्दाफाश यात्रेत नाना पटोले म्हणाले 2014 मध्ये फडणवीस शासन आल्यानंतर दीड लाख कोटींचा कर्ज 5 लाख कोटींवर गेले आहे मात्र विकासाच्या बाबतीत विचार केला तर, प्रत्येक विभागातील पदे खाली आहे म्हणजे नौकर भरती बंद केली, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती बंद केली,
लघु उद्दोग बंद होत आहेत, शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढले, मग विकास झाला कुठे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सध्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना काढली ही फसवी योजना आहे कारण शेतकऱ्यांचे पैसे 20 वर्ष घेऊन त्यातूनच शेतकऱ्यांना पेन्शन देणार आहे म्हणजे तुमचे पैसे तुम्हला देत, पेट्रोल आणि दिसेल च्या नावाने दुष्काळ सेस घेत आहे मात्र दुष्काळ निवारण झाले का, कर्ज माफी ला 3 वर्ष लोटले अजूनही शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली नाही असे फसवे काम फडणवीस सरकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
रिजर्व बँकेतीक देशाच्या संकटाच्या वेळेस कामात येईल असा राखीव पैसाही या भाजपा शेसनाने काढून घेतले, अमरनाथ ची यात्रा थांबवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखविण्याचे महा पाप या मोदी सरकारने केली, मोदी शासन आल्यानंतच गाई म्हशी कापण्याचे काम मोठ्या प्रमाणात वाढले, मोदी शासन येण्यागोदार आपण बीप विक्रीत 10 व्या स्थानी होतो आता आपण पहिल्या स्थानी आहोत. भाजपाने ज्या पद्धतीने लोकांना केवळ चुकीच्या गोष्टी पसरवीत आहे त्यामुळे ही लढाई मोठी आहे मात्र काँग्रेस च्या वतीने लोक मोठ्या प्रमाणात आहेत हे मला वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या सभेच्या दरम्यान दिसले तेव्हा येणाऱ्या विधान सभेसाठी तयार व्हा एकत्रित लढा द्या विजय निश्चित आहे.
आज झालेल्या महा पर्दाफाश सभेत भंडारा काँग्रेस मध्याला वाद पुन्हा समोर आले विद्यमान जिल्ह्या अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी या यात्रेबद्दल जिल्ह्यातील बऱ्याच वरिष्ठांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलेच नाही केवळ सर्वत्र आपलेच बॅनर लावले एवढंच नव्हे तर सभेच्या स्थळी मंचावर लावलेले बॅनर वर ही सभा नाना पटोले यांची नसून त्यांचीच आहे का असे वाटत होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.