ETV Bharat / state

Nagar Panchayat Presidential Election Bhandara : भंडारा जिल्ह्यातील तीन नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण - लाखनीमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष

लाखांदूर नगरपंचायतीत भाजपाचे नगराध्यक्ष व अपक्षाला नगरउपाध्यक्ष पद दिले गेले आहे. नगराध्यक्ष पदी भाजपाचे विनोद ठाकरे तर नगरउपाध्यक्ष पदी अपक्ष नगरसेवक प्रल्हाद देशमुख यांची निवड झाली आहे. लाखांदूर नगरपंचायतीत 17 पैकी भाजपाचे 9 सदस्य निवडूण आले होते. बहुमत असतांना देखील अपक्ष नगरसेवकाला उपाध्यक्ष पद का दिले हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.

विजयी उमेदवार
विजयी उमेदवार
author img

By

Published : Feb 17, 2022, 5:12 PM IST

Updated : Feb 17, 2022, 5:25 PM IST

भंडारा - जिल्ह्यात आज 3 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक ( Election of Mayor ) झाली असून दोन ठिकाणी भाजपा तर एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. 19 जानेवारीला झालेल्या या तीनही नगरपंचायतीच्या निकालात मोहाडी आणि लाखांदूर तालुक्यात भाजपाने ( BJP in Mohadi and Lakhandur talukas ) 17 पैकी 9 जागा मिळवून बहुमत मिळविला होता.

विजयी उमेदवारांचा जल्लोश
  • मोहाडी नगरपंचायत ठरली वादग्रस्त

दोन टप्प्यात पार पडलेल्या नगरपंचायतचा निकाल 19 जानेवारीला लागला. यामध्ये मोहाडी नगरपंचायतीमध्ये 17 पैकी 9 जागा जिंकून भाजपाने बहुमत मिळविला. त्यामुळे मोहाडी नगरपंचायतमध्ये भाजपाची सत्ता स्थापन होईल, हे निश्चित झाले होते. मात्र असे असले तरी 16 फेब्रुवारीपर्यंत पंचायतीवर नेमकी सत्ता कोणाची बसणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून होते. कारण भाजपामधील दोन गटातील अंतर्गत वादामुळे हाती आलेली सत्ता एक गट दुसऱ्या पक्षाची मदत घेऊन सत्ता स्थापन करेल, अशी चर्चा सतत सुरू होती. मात्र 16 फेब्रुवारीला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी या दोन्ही गटाला एकत्रित बोलून त्यांच्यात समिट घालून आणला. त्यामुळे 17 फेब्रुवारीला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे बहुमत सिद्ध करत भाजपाच्या छाया डेकाटे यांची नगराध्यक्षपदी तर नगर उपाध्यक्षपदी शैलेश गभने यांची निवड झाली आहे.

  • लाखांदूरमध्ये भाजपाचे बहुमत असूनही उपाध्यक्ष अपक्ष

लाखांदूर नगरपंचायतीत भाजपाचे नगराध्यक्ष व अपक्षाला नगरउपाध्यक्ष पद दिले गेले आहे. नगराध्यक्ष पदी भाजपाचे विनोद ठाकरे तर नगरउपाध्यक्ष पदी अपक्ष नगरसेवक प्रल्हाद देशमुख यांची निवड झाली आहे. लाखांदूर नगरपंचायतीत 17 पैकी भाजपाचे 9 सदस्य निवडूण आले होते. बहुमत असतांना देखील अपक्ष नगरसेवकाला उपाध्यक्ष पद का दिले हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. भाजपाचे नवनियुक्त नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांना 17 पैकी 10 मते मिळाले असून 1 अपक्ष नगसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • लाखनीमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष

तीन नगरपंचायतीच्या निकालापैकी दोन ठिकाणी भाजपाने एक हाती सत्ता काबीज केली असली तरी लाखनी नगरपंचायतीत काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांची आघाडी झाली आहे. लाखनीमध्ये 17 पैकी राष्ट्रवादीला 8 काँग्रेस 2 भाजपा 6 अशी परिस्थितीत होती. अपेक्षेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बहुमत सिद्ध करत राष्ट्रवादीला नगराध्यक्ष पद तर काँग्रेसला नगरउपाध्यक्ष मिळविला आहे. नगराध्यक्ष पदी राष्ट्रावादीच्या त्रिवेणी पोहरकर तर नगरउपाध्यक्ष पदी काँग्रेसचे प्रदीप तितरमारे यांची निवड झाली आहे.

हेही वाचा - Amravati Muncipal Corporation : अमरावती महापालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; नगरसेवकांमध्ये झडप

Last Updated : Feb 17, 2022, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.