भंडारा - कोंढा येथील कार्यरत असलेल्या आरोग्य सेवकाला चकरा गावात महिलांसाठी व्हॅक्सीन पोहचवण्याचे काम दिले होते. मात्र, एवढे जवाबदरीचे काम दिल्यावरही हा कर्मचारी मद्य प्राशन करून गाडीतच झोपून राहिला. याची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला, आणि त्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर त्यांच्या सल्ल्या नुसार कार्यवाही करू असे वैद्यकीय अधिकारी ऱ्यानी सांगितले.
चकरा गावात महिलांसाठी आरोग्य सेवा सत्राचे आयोजन केले होते. आरोग्य सेवीका आणि महिला सकाळी नऊच्या सुमारास अंगणवाडीत पोहचल्या. मात्र, 2 तासानंतर ही व्हॅक्सीन पोहचल्या नाहीत. त्यामुळे गावकर्यांनी व्हॅक्सीन का पोहचल्या नाही याची माहिती घेण्याचा प्रयन्त केला. यावेळी आरोग्य सेवक संजय कन्नके व्हॅक्सीन घेऊन बऱ्याच कालावधी पूर्वी कोंढा येथून निघाल्याची माहिती मिळाली. त्याला फोन केला असता मी रस्ता विसरलो असे उडवाउडवीचे उत्तर त्यांने दिले. त्याचा शोध घेतला असता तो मद्य प्राशन करून गाडीतच झोपला होता.
गावकऱ्यानी त्याच्या कडील व्हॅक्सीन चे बॉक्स घेतले. त्यानंतर गावा पोहचल्यानंतर आरोग्य सेवा सत्र सुरू झाले. त्याचा व्हिडिओ काढत या प्रकरणाची माहिती कोंढा प्राथमिक केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली. हा व्हिडिओ चांगलाच वायरल झाला आहे. त्याची तक्रार वरिष्ठांना दिली असून त्यांच्या सुचने नुसार यावर कार्यवाही करू असे उत्तर वैद्यकीय अधिकाऱ्यानी सांगितले.