ETV Bharat / state

भंडारेकर कोरोनाबाबतीत अजूनही सतर्क, मास्क घालून करीत आहेत दिवाळीची खरेदी

author img

By

Published : Nov 11, 2020, 7:54 PM IST

शहरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. विशेषतः कपडे खरेदीसाठी नागरिकांची दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या सर्व गोष्टींमध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे नागरिक तोंडाला मास्क, रुमाल, किंवा स्कार्फ बांधून घरून खरेदीसाठी निघत आहेत.

भंडारा
भंडारा

भंडारा - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, तरीही जिल्ह्यातील नागरिक कोरोनाविषयी जागृकता ठेवून दिवाळीची खरेदीही मास्क घालूनच करत आहेत. मात्र, असे असले तरी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे सुरक्षित अंतर पाळणे कठीण होत आहे.

यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतांशी सण साजरे झाले नाहीत. दिवाळी सुद्धा साजरी होणार नाही, अशी अपेक्षा होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिक खरेदीसाठी घराबाहेर निघतील का? याची शंका होती. मात्र, सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर निघत आहेत.

खरेदी करताना कोरोनाबाबत काळजी

शहरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. विशेषतः कपडे खरेदीसाठी नागरिकांची दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या सर्व गोष्टींमध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे नागरिक तोंडाला मास्क, रुमाल, किंवा स्कार्फ बांधून घरून खरेदीसाठी निघत आहेत. खरेदी करीत असताना सुद्धा मास्क काढला जात नाही. जवळपास 95 टक्के नागरिक तोंडाला मुखपट्ट्या बांधून खरेदीसाठी बाजारपेठेत आलेले दिसले. केवळ पाच टक्के नागरिकांना अजूनही ही त्यांच्या जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य समजलेले नाही, असेच म्हणता येईल.

नागरिकांची जागृकता

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुखपट्या बांधणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि सॅनिटाईझ करणे या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मात्र, दिवाळीच्या खरेदीसाठी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे सुरक्षित अंतर ठेवणे सध्यातरी कठीण जात आहे. तोंड बांधणे आणि सॅनिटाईझ करणे या दोन महत्त्वाच्या गोष्टी नागरिक करत असल्यामुळे जागरूक असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांची हिच जागृकता व्यापारपेठा सुरू ठेवण्यासाठी आणि कोरोनावर मात करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तशीच लाट भारतात येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी कोरोना कमी होत आहे, आता घाबरण्याचे कारण नाही असे म्हणून गाफील राहू नये. कोरोनाचे समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत मुखपट्या, सुरक्षित अंतर ठेवणे आणि हात स्वछ ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे म्हणून रोजच्या जीवनशैलीत याचे पालन करावे, तरच आपण कोरोनाला पूर्णपणे हरवू शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.