ETV Bharat / state

साकोलीतील 'त्या' अल्पवयीन मुलीने प्रेमात नैराश्यापोटी आत्महत्या केल्याचा अंदाज; पोलीस तपास सुरू - अल्पवयीन मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह bhandara

साकोली येथील एका शाळेत शिकणारी 15 वर्षीय मुलगी 14 डिसेंबरला नेहमी प्रमाणे घरातून शाळेत जात असल्याचे सांगून सायकल घेऊन निघाली. मात्र, मृत मुलगी हि शाळेत न जाता आपल्या मैत्रिणीकडे गेली आणि तेथून शाळेचा ड्रेस बदलून साकोली शहरात गेली. शाळा सुटली तरी मुलगी घरी परत न आल्याने कुटूंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. संध्याकाळ होऊनही मुलगी घरी  न परतल्याने शेवटी कुटूंबियांनी साकोली पोलीस स्टेशनमध्ये तिची बेपत्ता असल्याची तक्रार केली.

bhandara
साकोलीतील 'त्या' अल्पवयीन मुलीने प्रेमात नैराश्यापोटी आत्महत्या केल्याचा अंदाज; पोलीस तपास सुरू
author img

By

Published : Jan 26, 2020, 1:20 AM IST

भंडारा - साकोली तालुक्यात तब्बल 40 दिवसांनंतर एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमात आलेल्या नैराश्यापोटी या मुलीने स्वतः विष प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परंतू, संपूर्ण तपास झाल्यानंतर ही हत्या की आत्महत्या होती याचा खुलासा होईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. मुलीच्या पालकांनी मात्र मुलीची हत्या करून या ठिकाणी मृतदेह आणून टाकल्याचा आरोप केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनीही तपासात दिरंगाई केल्याचा आरोप मृत मुलीच्या कुटूंबाने केला आहे.

साकोलीतील 'त्या' अल्पवयीन मुलीने प्रेमात नैराश्यापोटी आत्महत्या केल्याचा अंदाज; पोलीस तपास सुरू

हेही वाचा - काळ आला होता पण वेळ आली नव्हती, तुमसर तालुक्यात वाघाची दहशत

साकोली येथील एका शाळेत शिकणारी 15 वर्षीय मुलगी 14 डिसेंबरला नेहमी प्रमाणे घरातून शाळेत जात असल्याचे सांगून सायकल घेऊन निघाली. मात्र, मृत मुलगी हि शाळेत न जाता आपल्या मैत्रिणीकडे गेली आणि तेथून शाळेचा ड्रेस बदलून साकोली शहरात गेली. शाळा सुटली तरी मुलगी घरी परत न आल्याने कुटूंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. संध्याकाळ होऊनही मुलगी घरी न परतल्याने शेवटी कुटूंबियांनी साकोली पोलीस स्टेशनमध्ये तिची बेपत्ता असल्याची तक्रार केली.

हेही वाचा - VIDEO: वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांवर वाघाचा हल्ला

घटेनच्या 4 दिवसानंतर मृत मुलीची सायकल वन विभागाच्या नर्सरी जवळ मिळाली. मात्र, मुलीचा थांगपत्ता लागला नाही. शेवटी चाळीस दिवसानंतर त्याच नर्सरीमध्ये मुलीचा झाडाला टेकून कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळाला. सुरुवातीला हा मृतदेह आपल्या मुलीचा नसल्याचा दावा करणाऱ्या कुटूंबियांनी मृतदेहाजवळ मिळालेल्या शालेय पुस्तके, ड्रेस, घड्याळ या वस्तूंवरून मृतदेहाची ओळख पटवली. ज्या ठिकाणी सायकल मिळाली त्याच परिसरात तब्बल 40 दिवसानंतर मुलीचा मृतदेह मिळाल्याने मृत मुलीच्या कुटूंबियांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हेही वाचा - भंडाऱ्यात 40 दिवसांपूर्वी हरवलेल्या शाळकरी मुलीचा मृतदेह सापडला; पोलीस तपास सुरू

या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने केला असता तर मुलीचा मृत्यू झाला नसता असे तिच्या कुटूंबियांनी म्हटले आहे. मुलीची हत्या करून मृतदेह त्या ठिकाणी आणून ठेवल्याचा आरोप पालकांनी केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या प्राथमिक तपासात या मुलीचे गावातीलच एका मुलाबरोबर प्रेम संबंध होते. मात्र दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने मुलाने मुली पासून दूर राहायला सुरुवात केली. त्यामुळेच प्रेमातील नैराश्यापोटी या मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. परंतू असे असले तरी पोलिसांनी यावर बोलण्याचे टाळले आहे. मात्र, या मुलीने स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली की, कोणी तिची हत्या केली, याचा तपास पोलीस करीत असून पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जी केली का याचा ही तपास पोलीस उपाधिक्षकांमार्फत केला जात आहे. याप्रकरणाचा लवकरच छडा लागेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक यांनी दर्शविला आहे.

Intro:Body:Anc :- साकोली तालुक्यात एका अल्पवयीन शालेय मुलीचा मृतदेह तब्ब्ल 40 दिवसा नंतर कुंजलेल्या अवस्थेत मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमातील नैराश्य पोटी या मुलीने स्वतः वीस प्राशन केल्याचा पोलीसांच्या प्राथमिक अंदाज असला तरी तरी संपूर्ण तपास झाल्यानंतर ही हत्या की आत्महत्या याचा खुलासा होईल असेे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. तर मुलीच्या पालकांनी मात्र मुलीची हत्या करुण या ठिकाणी मृतदेह आणून फेकल्याचा आरोप केला आहे. तसेच पोलिसांनीही तपासात दिरंगाई केला असल्याचा आरोप परिवाराने केला आहे.
साकोली येथील कृष्णमुरारी कटकवार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शिकनारी १५ वर्षीय मुलगी हि रोजच्या प्रमाणे १४ डिसेंबरला घरून शाळेत जात असल्याचे सांगून सायकल घेऊन घरून शाळेत जायला निघाली .मात्र मृत मुलगी हि शाळेत न जाता आपल्या मैत्रिणी कडे गेली आणि तिथून शाळेचे ड्रेस बदलून साकोली शहरात गेली .मात्र शाळेला सुट्टी होऊनही मुलगी घरी परत न आल्याने पालकांनी सर्वत्र चौकशी केली मात्र संद्याकाळ होऊनही मुलगी घरी परत न आल्याने पालकाने शेवटी साकोली पोलिस स्टेशन मध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली. घटेनच्या ४ दिवसा नंतर मृत मुलीची सायकल वन विभागाच्या नर्सरी जवळ मिळाली मात्र मुलीचा थांगपत्ता लागला नाही शेवटी चाळीस दिवसानंतर त्यात नर्सरीमध्ये मुलीचा कुजलेल्या अवस्थेत झाडाला टेकून मृतदेह मिळाला. सुरुवातीला सुरूवातीला हा मृतदेह आपल्या मुलीचा नसल्याचा दावा करणाऱ्या कुटुंबांनी मृतदेहाजवळ मिळालेली शालेय पुस्तके, ड्रेस, घड्याळ हे आपल्या मुलीचे असल्याने हा तिचा मृतदेह आहे अशी ओळख पाठविली. ज्या ठिकाणी सायकल मिळाली त्याच परिसरात तब्बल 40 दिवसानंतर आमच्या मुलीचा मृतदेह मिळाला आहे जर पोलिसांनी योग्य चौकशी केली असती आमच्या आमच्या मुलीचा मृत्यू झाला नसता मुलीची हत्या करून मृदेह त्या ठिकाणी आणून ठेवल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या प्राथमिक तपासात या मुलीचे गावातीलच एका मुलाबरोबर प्रेम संबंध होते मात्र हेे दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने मुलाने मुली पासून दूर राहायला सुरुवात केली त्यामुळेच प्रेमाच्या नैराश्य पोटी या मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचा पोलिसांना संशय असला तरी पोलिसांनी यावर भास्य करणे टाळले आहे .मात्र ह्या मुलीने स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली कि कुणी तिची हत्या केली याचा तपास सध्या पोलीस करीत असून पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जी केली काा याचा ही तपास पोलीस उपाधिक्षक मार्फत केल्या जात असून लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल असा विश्वास पोलीस अधीक्षक यांनीी दर्शविला:
बाईट : मृतक मुलीची आत्या
बाईट : अरविंद साळवे, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.