भंडारा - भंडारा जिल्ह्यात काही दिवसांपासून संध्याकाळी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. हा अवकाळी पाऊस वादळवाऱ्यासह गारपीठीचा आहे. या पावसाने भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात हाहाकार माजवला आहे. जेवनाळा येथील शेतकरी प्रमोद भूते यांचे उन्हाळी पीक अक्षरक्ष: शेतात आडवे पडले आहे. तर, काही भागात पिकांना धान्यच राहिले नाही.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदार संघासह इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात या पावसाने हजेही लावली आहे. अशा अवकाळी पावसाने सगळीकडे हाहाकार माजवला असल्याने, यामध्ये होणारे नुकसान कसे भरून काढायचे हा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. या संकटात कुणीतरी धावून यावे या अपेक्षेने येथील शेतकरी प्रमोद भुते यांनी 'नाना भाऊ सांगा तुम्हीच आता आम्ही जगावे कसे'? अशी खंत व्यक्त आहे.
घरांचेही झाले नुकसान
जिल्ह्यातील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. ही स्थिती संपूर्ण जिल्ह्यात पहायला मिळत आहे. उन्हाळी धानासह शेतातील भाजीपाल्यालाही गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. तसेच येथील शेतीसह घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
खरीपातही झाले होते नुकसान
या अवकाळी पावसाने उन्हाळी धान पिकांचे नुकसान केले आहे, तर खरीप हंगामात लागलेल्या मावा तुडतूडामुळेही शेतकऱ्यांचे धान पिकांचे नुकसान झाले होते. मात्र, या नुकसानाची रक्कम अद्याप न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून ह्यावेळी ही उन्हाली धान घेतले आहेत. नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे जे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई म्हणून सरकारने काही मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. केवळ निवडणुकांच्या कालावधीत शेतकऱ्यांसाठी घोषणा करतात. मात्र, नंतर या नेत्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - कोरोना रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांची अरेरावी; जिल्हा रुग्णालयात घातला गोंधळ