जालना - भोकरदन तालुक्यातील नळनी येथे शॉर्टसर्किटमुळे घरात जमा केलेला १० ते १५ क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे शरद उत्तमराव जाधव या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
सध्या कापसाला थोडफार भाव मिळत आहे. तसेच कापसाचे भाव पुढे वाढणार असल्याचे संकेत लक्षात ठेवत शेतकरी बांधव आपल्या शेतातील कापूस वेचून ठेवत आहे. नळणी येथील शरद जाधव यांनीसुध्दा कापूस वेचून घरी जमा करून ठेवला होता. मात्र, रात्री अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील अंदाजे १० ते १५ क्विंटल जळून गेला. या घटनेने शेतकरी शरद यांचे आर्थिक नुकसान झाल्याने ते चिंतेत सापडले आहेत. तसेच शासनाने याची दखल घेऊन नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा - संतापजनक..! जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण करुन तरुणीचा विनयभंग
हेही वाचा - जालना बसस्थानकाचे काम २ वर्षांपासून रखडले; प्रवाशांची गैरसोय, उत्पन्नावरही पाणी