ETV Bharat / state

गोसेखुर्द प्रकल्पातील पुनर्वसित गावांमधील विकासकामांत कोट्यवधीचा घोटाळा, राष्ट्रवादीचा आरोप

author img

By

Published : Sep 3, 2019, 10:03 PM IST

गोसेखुर्द प्रकल्पातील पुनर्वसित गावांमध्ये विकास कामे सुरु आहेत. त्यात सिमेंट काँक्रीटच्या रेडिमेट नाल्या बसवण्यात येत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

बांधकामात कोट्यावधीचा घोटाळा

भंडारा - विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी पदाचा दुरुपयोग केला. तसेच कुटुंबातील लोकांना फायदा पोहोचविला असल्याचा आरोप युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी केला आहे. पुनर्वसनाच्या कार्यात तयार नाली (प्रिकास्ट ड्रेन) बनविण्याचे कोट्यावधीचे काम अतुल सुर्वे या कुटुंबातील व्यक्तींना देण्यात आले. तसेच अविनाश सुर्वे हे सेवानिवृत्त होऊनही त्यांना एक वर्ष वाढीव कार्यकाळ का दिला असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

काँक्रीट नाल्याच्या बांधकामात कोट्यावधीचा घोटाळा

गोसे प्रकल्पबाधित 14 गावांचे पुनर्वसनाचे काम सध्या सुरू आहे. या गावांमध्ये कारखान्यात तयार केलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रेडिमेट नाल्या बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम राईट नामक कंपनीला दिण्यात आले. या कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत 10 हजार रेडिमेट तयार नाल्या पुनर्वसनाच्या गावात बसविले गेले असून अजून जवळपास एक ते दोन हजार नाल्या बसविण्याचे काम बाकी आहे. राईट ही कंपनी विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांचे नातेवाईक अतुल सुर्वे यांची असल्याचा दावा युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी केला आहे. त्यांच्या मते मुजबी ग्रामपंचायतला अतुल सुर्वे यांनी राईट या कंपनीच्या लेटरपॅडवर ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. म्हणजेच ही कंपनी त्यांचीच आहे असे दिसून येत आहे. तसेच कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांचा कालावधी संपला असूनही त्यांना एक वर्षासाठी सेवाकाळ वाढवून दिला गेला आहे.

या दोन्ही गोष्टींमुळे इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी यशवंत सोनकुसरे यांनी केली आहे. या नाल्या ज्या पद्धतीने बसविले गेल्या आहेत त्यामुळे पाणी जमा होते. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास मोठ्या अडचणी येत आहे. याविषयी कंपनीमध्ये कार्यरत अधिकाऱ्याला विचारले असता ही कंपनी दीपक करगळ यांची असून सुर्वे नावाच्या कोणत्याही व्यक्तीचा या कंपनीशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. या दोघांपैकी नेमका कोण खरे बोलतो आहे हे आता चौकशीअंती समोर येईल.

Intro:ANC : विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून कुटुंबातील लोकांना फायदा पोहोचविला असल्याचा आरोप युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी केला आहे पुनर्वसनाच्या कार्यात तयार नाली (प्रिकास्ट ड्रेन) बनविण्याचे कोट्यावधी चे काम अतुल सुर्वे या कुटुंबातील व्यक्तींना दिले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच अविनाश सुर्वे हे सेवानिवृत्त होऊनही त्यांना एक वर्ष वाढीव कार्यकाळ का दिला असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीचे सुर्वे नामक व्यक्तीचे कोणतेही संबंध नसल्याचे सांगितले.

Body:गोसे प्रकल्प बाधित 14 गावांचे पुनर्वसनाचे काम सध्या सुरू आहे या गावांमध्ये कारखान्यात तयार केलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रेडिमेट नाल्या बसविण्याचे काम सुरू आहे हे काम राईट नामक कंपनीला दिले गेले असून या कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत 10000 रेडिमेट तयार नाल्या पुनर्वसनाच्या गावात बसविले गेले असून अजून जवळपास एक ते दोन हजार नाल्या बसविण्याचे काम बाकी आहे राईट ही कंपनी विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांचे नातेवाईक अतुल सुर्वे यांची असल्याचा दावा युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी केला आहे त्यांच्या मते ज्या मुजबी गावात हा कारखाना सुरू आहे तिथे कारखाना सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतला अतुल सुर्वे यांनी राईट या कंपनीच्या लेटरपॅडवर ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता म्हणजेच ही कंपनी त्यांचीच आहे असे दिसून येत आहे तसेच कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांचा कालावधी संपला असूनही त्यांना एक वर्षासाठी सेवाकाळ वाढवून दिला गेला आहे या दोन्ही गोष्टींमुळे इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी यशवंत सोनकुसरे यांनी केली आहे. या नाल्या ज्या पद्धतीने बसविले गेल्या आहेत त्यामुळे पाणी जमा होते त्यामुळे पाणी पाहून जाण्यास मोठ्या अडचणी येत आहे याविषयी कंपनी मध्ये कार्यरत अधिकाऱ्याला विचारले असता ही कंपनी दीपक करगळ यांची की असून सुर्वे नावाच्या कोणत्याही व्यक्तीचा या कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. या दोघांपैकी नेमका कोण खरे बोलतो आहे हे आता चौकशीअंती समोर येईल. बाईट : यशवंत सोनकुसरे, युवा राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हा अध्यक्ष शशांक त्रिपाठी, कारखान्यातील अभियंता,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.