ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात - news about Corona vaccination

भंडारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शासकीय आणि खाजगी आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

Corona vaccination started in Bhandara district
भंडारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात
author img

By

Published : Jan 16, 2021, 7:31 PM IST

भंडारा - बहुप्रतीक्षित कोरोना लस देण्याच्या कार्याला शनिवार पासून भंडारा जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील डॉक्टर पासून लसीकरणाला सुरुवात झाली असून या कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी हे उपस्थित होते. कोरोनावरील लस घेतलेल्या डॉक्टरांनी कोणतीही भीती न बाळगता सर्वांना ही लस घेण्याचे आव्हान केले आहे. आम्हाला कोणतीही त्रास जाणवत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

भंडारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात

सकाळी 11ला देण्यात आली पहिली वॅक्सिन -

संपूर्ण देशात ज्या कोरोना लसीची प्रतीक्षा होती त्याची आजपासून सुरुवात झाली आहे. 16 तारखेला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लस देण्याचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेच्या वेळेस खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. सुरवातीला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर जक्काल यांना ही लस देण्यात आली. त्यानंतर खाजगी दवाखान्यातील डॉक्टर नितीन तुरसकर यांना ही लस देण्यात आली.

9500 डोस झाले उपलब्ध -

भंडारा जिल्ह्यासाठी 9500 कोरोना लसीचे डोज उपलब्ध झाले असून 4500 लोकांना दोन टप्प्यात ही लस दिली जाणार आहे. सुरुवातीला सर्व डॉक्टर्स आणि नर्स यांच्यासह फ्रंट लाईन वॉरियर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने ही लस देण्यात येणार आहे. दररोज 300 लोकांना ही लस भंडारा, तुमसर आणि लाखनी या तीन तालुक्यांमध्ये दिली जाणार आहे.

लस देण्याच्या ठिकाणी सर्व व्यवस्था आली ठेवण्यात -

ज्या ठिकाणी लस देण्याचे आयोजन करण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी प्रतीक्षा रूम, व्हॅक्सिनेशन रूम आणि व्हॅक्सिनेशन दिल्यानंतर देखरेक रूम अशा तीन टप्प्यात आयोजन करण्यात आले आहे. व्हॅक्सिनेशन दिलेल्या व्यक्तीवर अर्धा तास लक्ष ठेवून जर त्यांना कुठलीही लक्षणे आढळली नाहीत तर त्यांना तिथून जाता येते.

भीती बाळगू नका ही लस तुमच्या फायद्याची -

कोरोना लस घेतलेल्या डॉक्टरांनी या व्यक्तीबद्दल मनोगत व्यक्त करतांना सांगितले की आमच्या मनात याविषयी कुठलीही भीती नव्हती आणि लस देण्यासाठी शासनाने आयोजित केलेले जी व्यवस्था आहे ती अतिशय सुंदर असून व्हॅक्सिनेशन घेताना कुठलाही त्रास जाणवला नाही किंवा यानंतर ही आता त्रास जाणवत नाही आहे. ही लस कोरोना पासून लढण्यासाठी सर्वात चांगला उपाय आहे. प्रत्येकाने व्यक्तीने लस घेतल्यानंतर कोरोना चे सर्व नियम पाळावे अशी विनंती यावेळी लस घेतलेल्या डॉक्टरांनी इतर नागरिकांना केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.