ETV Bharat / state

नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष - Nana Patole supporters in Bhandara

राजकीयदृष्ट्या नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या भंडारा जिल्ह्याला मागील दोन वर्षात दोन बहुमानाची पदे मिळाले आहेत. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत साकोली विधानसभा क्षेत्रातून नाना पटोले यांनी निसटता विजय मिळविला होता.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
author img

By

Published : Feb 5, 2021, 9:31 PM IST

Updated : Feb 5, 2021, 9:56 PM IST

भंडारा - साकोली विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आमदार व माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर नेमणूक झाली आहे. हा आनंद भंडारा शहरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून साजरा केला.

मागील कित्येक दिवसांपासून नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होतील अशी चर्चा सुरू होती. शेवटी या चर्चेला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. दिल्लीवरून नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी पुढे आली. सध्या नाना पटोले हे मुंबईला आहेत. भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील गांधी चौकात फटाके फोडून आणि घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष

हेही वाचा-'थेट मुख्यमंत्री कार्यालयातून आता लोणार विकासाचा कार्यक्रम'

दोन वर्षात दोनदा मिळाले जिल्ह्याला बहुमान

राजकीयदृष्ट्या नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या भंडारा जिल्ह्याला मागील दोन वर्षात दोन बहुमानाची पदे मिळाले आहेत. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत साकोली विधानसभा क्षेत्रातून नाना पटोले यांनी निसटता विजय मिळविला होता. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर नाना पटोले यांना मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा नानांच्या चाहत्या वर्गांची होती. मात्र, त्यांना कोणतेही मंत्रिपद मिळाले नव्हते. तरी विधानसभा अध्यक्ष म्हणून घटनात्मकदृष्ट्या अतिशय सन्मानाचे पद मिळाल्यानंतर भंडारा जिल्ह्याच्या नावावर मानाचा तुरा रोवला गेला. जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढा मोठा राजकीय पद मिळाले होते. या पदाचा उपयोग करीत नाना पाटील यांनी जिल्ह्यातील विकासासाठी आणि महाराष्ट्रासाठी बरेच चांगले निर्णय घेतल्याचा दावा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. नाना पटोले त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता लक्षात घेऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नाना पटोले यांना पुन्हा मोठी जबाबदारी दिली. त्यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली. हे दोन्ही पद जिल्ह्यात एकाही व्यक्तींना मिळालेला नव्हता. त्यामुळे ही पदे जिल्ह्यासाठी आणि राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आणि ऐतिहासिक ठरले आहेत.

हेही वाचा-'संविधानाच्या चाकोरीत राहून राज्यात काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनविणार'

असा राहिला नाना पटोले यांचा राजकीय प्रवास-

नाना पटोले हे अगदी सुरुवातीपासून काँग्रेसमध्येच होते. मात्र विधानसभेमध्ये धानाची पेंडी जोडून त्यांनी शेतकऱ्यांची आवाज उचलत आमदारपदाचा राजीनामा दिला. नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. तोपर्यंत ते तीनदा आमदार म्हणून निवडून आले होते. भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपने त्यांना खासदारकीचे तिकीट दिले. त्या निवडणुकीत त्यांनी तब्बल दीड लाख मताने राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल यांचा पराभव केला. मात्र, तीनच वर्षात त्यांनी भाजपमध्ये बंड करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वक्तव्य केले. त्यामुळे त्यांना भाजप सोडावा लागला. भाजप सोडल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

नागपूरवरून नितीन गडकरी यांना आव्हान देत खासदारकीची निवडणूक लढविली त्यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला. निवडणूक हरलो तर मी राजकारणापासून संन्यास घेईल असे वक्तव्य एका वाहिनीवर जाहीररीत्या केले होते. त्यामुळे नाना पटोले यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्या मतदारसंघ साकोली येथून आमदारकीचे तिकिट दिले. ५० हजार मतांच्या वरून निवडून येणारे नाना पटोले यांचा या निवडणुकीत केवळ पाच हजार मतांनी निसटता विजय मिळविला. त्यामुळे नाना पटोले यांची लोकप्रियता कमी झाली असे वाटत असतानाच काँग्रेसने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास हा त्यांच्यासाठी नवीन संजीवनी ठरलेला आहे.

Last Updated : Feb 5, 2021, 9:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.