ETV Bharat / state

मागील ५ वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा तिप्पट कामे केली; मुख्यमंत्र्यांचा दावा - minister chandrshekhar bavankule

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा आज (शनिवारी) भंडारा जिल्ह्यात पोहोचली. आम्ही मागील पाच वर्षाच्या काळात विरोधकांपेक्षा तिप्पट कामे केली असल्याची टीका फडणवीसांनी केली. मागील काही दिवसापासून भाजपामध्ये सुरू असलेली इन्कमिंग आज पुन्हा पाहायला मिळाली. बसपतर्फे खासदारकीची निवडणूक लढविणार्‍या विजया नंदुरकर आणि त्यांचे पती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Aug 3, 2019, 8:19 PM IST

भंडारा - आम्ही मागील पाच वर्षात विरोधकांपेक्षा तिप्पट कामे केली, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा आज (शनिवारी) जिल्ह्यात पोहोचली. त्यावेळी शहरातील शिवाजी स्टेडियममध्ये घेतलेल्या सभेत लोकांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री परिणय फुके हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना संबोधित करताना "मागील पाच वर्षात आम्ही जे कार्य केले त्याचा लेखाजोखा मायबाप मतदार राजासमोर मांडण्यासाठी ही महाजनादेश यात्रा काढली आहे." असे म्हणाले. पुढे त्यांनी विरोधकांवरही टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांकडे आता विरोध करण्यासाठी कुठलेही मुद्दे नसल्याने ते ईव्हीएम मशीनचा मुद्दा काढत आहेत. आम्ही लोकांसाठी आंदोलन केले तर विरोधक मात्र मशीनसाठी आंदोलन करत आहेत. यापेक्षा मोठे दुर्भाग्य काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथे यात्रेचे आगमन होताच भाजपतर्फे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, भाजप सरकारने मागील ५ वर्षात सर्वात जास्त लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. शिक्षण, रोजगार, उद्योगधंदे, शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न ही सर्व कामे आमच्या काळात मोठ्या प्रमाणात झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी एक वेगळा आणि ऐतिहासिक निर्णय घेताना आम्ही वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ वर केल्या. तसेच प्रत्येक व्यक्तीला घरे देण्याचा निर्धार केला, शेतीसाठी कृषिपंप दिले, जलशिवार योजनेतून सिंचनाच्या सोय उपलब्ध करून दिले आहेत तलावाचे पुनर्जीवन करण्यासाठी भंडारा-गोंदियाला २०० कोटी रुपये दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

आज पुन्हा इन्कमिंग -

मागील काही दिवसापासून भाजपामध्ये सुरू असलेली इन्कमिंग आज पुन्हा पाहायला मिळाली. बसपतर्फे खासदारकीची निवडणूक लढविणार्‍या विजया नंदुरकर आणि त्यांचे पती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला.

Intro:anc : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा आज भंडारा जिल्ह्यात पोहोचली यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री परिने फुके हे होते भंडारा शहरातील शिवाजी स्टेडियम मध्ये जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना संबोधित करीत मागील पाच वर्षात आम्ही जे कार्य केले त्याचा लेखाजोखा मायबाप मतदार राजा समोर मांडण्यासाठी हा महाजन आदेश यात्रा काढल्याले असल्याचे त्यांनी सांगितले.

Body:भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथे या यात्रेचे आगमन होताच बीजेपी तर्फे मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आला त्यानंतर शिवाजी स्टेडियम वर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरगच्च सभेला संबोधित करताना सांगितले की भाजपा सरकारने मागील पाच वर्षात सर्वात जास्त लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत शिक्षण रोजगार उद्योगधंदे शेतकऱ्यांचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न या सर्व कामे बीजेपी शासनाच्या काळात मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांसाठी एक वेगळा आणि ऐतिहासिक निर्णय घेताना आम्ही वर्ग दोन च्या जमिनी वर्ग 1 वर केल्या असल्याचे त्यांनी सांगितले प्रत्येक व्यक्तीला घरे देण्याचा निर्धार केला आहे शेतीसाठी कृषिपंप दिले आहे जलशिवार योजनेतून सिंचनाच्या सोय उपलब्ध करून दिले आहेत तलावाचे पुनर्जीवन करण्यासाठी भंडारा-गोंदिया ला 200 कोटी रुपये दिले आहेत अशी त्यांनी यावेळी सांगितले.

मागील तीस वर्षात भंडाराच्या उत्थानासाठी जेवढा पैसा मिळाला त्यापेक्षा दुप्पट पैसा आम्ही मागील पाच वर्षात भंडाराच्या उद्धारासाठी दिलेला आहे गोसे धरणा च्या पाण्यामुळे 15 पंधरा वर्षा च्या कालावधी शंभर हेक्टर सिंचन ही झाला नाही मात्र मागच्या वर्षी आम्ही 50 हजार हेक्टर ा सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली या वर्षी एक लाख हेक्‍टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देईल असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं रखडलेला वेल प्रकल्प लवकरच सुरू करू हा प्रकल्प म्हणजे मागच्या शासनाच्या लोकांनी केलेली चूक होती असे त्यांनी यावेळी सांगितले.
मागील पाच वर्षाच्या काळात आणि काँग्रेस-राष्ट्रवादी पेक्षा तिप्पट कामे केली आहे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांकडे आता विरोध करण्यासाठी कुठलेही मुद्दे नसल्याने ते ईव्हीएम मशीन साठी सर्व एक विरोधक एकत्र येत आहे आम्ही लोकांसाठी आंदोलन केले विरोधक मात्र मशीन साठी आंदोलन करतात यापेक्षा मोठे दुर्भाग्य काय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मागील काही दिवसापासून भाजपामध्ये सुरू असलेली इन्कमिंग आज पुन्हा पाहायला मिळाली बसपा तर्फे खासदारकीची निवडणूक लढविणार्‍या विजया नंदुरकर आणि त्यांचे पती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीजेपी मध्ये प्रवेश मिळवला.
शिवाजी स्टेडियमवर झालेल्या सभेनंतर यात्रा तुमसर तालुक्यात पोहोचून कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली त्यानंतर ही महाजनादेश यात्रा गोंदिया च्या दिशेने निघाली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.