ETV Bharat / state

भंडारा शहरात अधिकारी कोमात, नियम तोडणारे जोमात

author img

By

Published : Jun 8, 2020, 9:00 PM IST

Updated : Jun 23, 2020, 8:52 PM IST

तुम्ही तुमचेच रक्षक, असे म्हणत शहरातील लोकांवरील प्रशासनाने आपले पूर्ण नियंत्रण काढले आहे असे चित्र सध्या आहे. अधिकाऱ्यांनी काढलेले आदेश सध्या फाईल मध्ये बंद करून कपाटात ठेवण्यात आले आहे. नियम तोडणाऱ्यांमुळें आणि कार्यव्यापासून दूर पडणाऱ्या अधिकारी आणि कर्मचार्यांमुळे जिल्ह्याला भविष्यात मोठी किंमत मोजावी लागू शकते. तेव्हा या साठी जवाबदार कोणला धरल्या जाईल आदेशाचे पालन न करणाऱ्यांना की त्यांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेल्या प्रशकीय यंत्रणेला.

citizen brake corona lockdown law in bhandara
भंडारा शहरात अधिकारी कोमात, नियम तोडणारे जोमात

भंडारा - चौथ्या लॉकडाऊननंतर बऱ्याच बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली. मात्र, त्यासाठी काही नियम बनवले गेले आणि तसे आदेश जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकारी यांच्या मार्फत काढण्यात आले. मात्र,अधिकारी कोमात आणि नियम तोडणारे जोमात, अशी परिस्थिती भंडारा शहरातील झालेली आहे. अधिकाऱ्यांनी आदेश तर काढले मात्र, त्याचे पालन होताना दिसत नाही. तरीही नियमांचा भंग करणाऱ्या लोकांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. याच गोष्टीचा फायदा घेत पान टपऱ्या आणि हात गाडीवाले यांनीही आदेश नसताना आपले व्यवसाय सुरू केले आहेत.

मुख्याधिकारी यांनी आदेश काढून काय बंद राहतील आणि काय सुरू राहतील आणि त्याची वेळ कोणती असेल या विषयीचा स्पष्ट निर्देश दिले होते. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद होते. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवसाय हे सकाळी 9 वाजे तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. सुरुवातीला काही दिवस सायंकाळी 5 नंतरही दुकान सुरू ठेवणाऱ्या व्यवसायिकांनावर कारवाई करून दंड वसूल केला. मात्र, मुख्याधिकारी यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्याला दंड का वसूल केले म्हणून सुनावले आणि तेव्हापासून नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई थांबवली. कारवाई थांबल्यामुळे काही व्यावसायिकांनी आपले दुकाने 5 नंतर ही सुरू ठेवायला सुरुवात केली. ही बाब पान टपरी आणि रस्त्या शेजारी खाद्य पदार्थांचे ठेले लावणाऱ्यांना लक्षात येताच त्यांना परवानगी नसतानाही खर्रा (गुटका), गुपचूप, चायनीज विकणाऱ्या लोकांनीही अवैधरित्या ठेले लावणे सुरू केले.तुम्ही तुमचेच रक्षक, असे म्हणत शहरातील लोकांवरील प्रशासनाने आपले पूर्ण नियंत्रण काढले आहे असे चित्र सध्या आहे. अधिकाऱ्यांनी काढलेले आदेश सध्या फाईल मध्ये बंद करून कपाटात ठेवण्यात आले आहे. नियम तोडणाऱ्यांमुळें आणि कार्यव्यापासून दूर पडणाऱ्या अधिकारी आणि कर्मचार्यांमुळे जिल्ह्याला भविष्यात मोठी किंमत मोजावी लागू शकते. तेव्हा या साठी जवाबदार कोणला धरल्या जाईल आदेशाचे पालन न करणाऱ्यांना की त्यांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेल्या प्रशकीय यंत्रणेला.

Last Updated : Jun 23, 2020, 8:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.