ETV Bharat / state

साकोली अन् लाखनी उड्डाणपूल भविष्यात 'स्टेट ऑफ आर्ट' म्हणून ओळखले जातील - केंद्रीय मंत्री गडकरी - लाखनी

भंडारा जिल्ह्यातील साकोली आणि लाखनी येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारा निर्मित उड्डाणपुलाच्या लोकार्पण रविवारी (दि. 29 मे) नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. भंडारा जिल्ह्यातील हे दोन्ही पूल भविष्यात स्टेट ऑफ आर्ट म्हणून ओळखले जातील. जेव्हा कधी उत्कृष्ट बांधकामाच्या उड्डाणपुलाला पुरस्कार देण्याची वेळ येईल तेव्हा लाखनी आणि साकोलीचा नक्कीच विचार केला जाईल, असे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : May 29, 2022, 10:30 PM IST

भंडारा - जिल्ह्यातील साकोली आणि लाखनी येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारा निर्मित उड्डाणपुलाच्या लोकार्पण रविवारी (दि. 29 मे) नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. भंडारा जिल्ह्यातील हे दोन्ही पूल भविष्यात स्टेट ऑफ आर्ट म्हणून ओळखले जातील. जेव्हा कधी उत्कृष्ट बांधकामाच्या उड्डाणपुलाला पुरस्कार देण्याची वेळ येईल तेव्हा लाखनी आणि साकोलीचा नक्कीच विचार केला जाईल, असे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

साकोली अन् लाखनी उड्डाणपूल भविष्यात 'स्टेट ऑफ आर्ट' म्हणून ओळखले जातील

पायाभूत सुविधांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. पर्यटन विकासातून रोजगार यावर काम सुरुच आहे. अन्य माध्यमातूनही रोजगार देण्याच्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध असून जिल्ह्यात साखर कारखान्यात सहाशे कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक करून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज साकोली येथे एका कार्यक्रमादरम्यान केली.

एकेरी स्तंभावर उभा असलेला हा देशातील पहिला पूल असून जल पुनर्भरणाच्या दृष्टीनेही संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. या पूर्ण निर्मितीमुळे महामार्गावरील पाच अपघातप्रवण स्थळे दूर करण्यात आम्ही यशस्वी झालो, असे सांगताना एक लाख वृक्षांची लागवडही या दरम्यान करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्यातील हे दोन्ही पूल भविष्यात स्टेट ऑफ आर्ट म्हणून ओळखले जातील. जेव्हा कधी उत्कृष्ट बांधकामाच्या उड्डाणपुलाला पुरस्कार देण्याची वेळ येईल तेव्हा लाखनी आणि साकोलीचा नक्कीच विचार केला जाईल, असेही गडकरी म्हणाले. पुलाला स्व. शामराव बापू कापगते यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत होती. शामराव बापूंचे कार्य पहाता ती मागणी नक्कीच योग्य होती. त्यांनी कुशीत समाजासाठी प्रामाणिक पणे कार्य करू समाज घडविला असे म्हणत यापुढे साकोलीचा उड्डाणपूल स्वर्गीय शामराव बापू कापगते उड्डाणपूल या नावाने ओळखला जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

वेगवेगळ्या माध्यमातून विकास साधण्याचा मानस आमचा आहे. सोबतच शेतकरीही समृद्ध व्हावा हा प्रयत्न आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या बॅक वॉटर च्या माध्यमातून विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले असून त्यातून रोजगार निर्मितीचे स्वप्न आहे. सोबतच मानस साखर कारखान्यात सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करून चार लाख लिटर इथेनॉल निर्मिती क्षमतेचा प्रकल्प लवकरच उभारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाच हजार लोकांना रोजगार मिळेल, असे सांगताना तीन महिन्यात प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, असेही गडकरी म्हणाले. भविष्यात कारखान्याची गाळप क्षमता वाढविली जाणार आहे. या कारखाण्यामुळे जिल्ह्यात क्रांती येईल, असा विश्वासही नितिन गडकरी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - विधवा वहिणीला सौभाग्याचं कुंकू लावत दीरानं स्वीकारले अडीच वर्षाच्या मुलाचं पितृत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.