ETV Bharat / state

लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला...वरमाईसह चार जणांचा मृत्यू - नागपूर

नागपूर-भंडारा रोडवर लग्नाची वऱ्हाड घेऊन चाललेली बस उभ्या कंटेनरवर आदळली. ही घटना आज पहाटे ५ ते ६ वाजेच्या दरम्यान घडली. घटनते ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, १२ ते १९ जण जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

marriage bus hit truck nagpur
बस अपघात
author img

By

Published : Feb 15, 2020, 11:53 AM IST

Updated : Feb 15, 2020, 1:30 PM IST

नागपूर- नागपूर-भंडारा रोडवर लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली बस रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळली. ही घटना आज पहाटे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १२ ते १९ जण जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेत जखमी झालेल्यांचे दृश्य

याघटनेत करूणा विजय खोंडे (वय.६०) आणि अजय आठवले (वय.२८) दोघेही राहणार नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला. तर, सतीश पुंडलिक जांभूळकर (वय.३५ रा. तिरोडा) आणि नवरदेवाची आई विठाबाई तुकाराम झिलपे (वय.७२ रा. नागपूर) यांना भंडारा येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये तेजस सतीश जांभूळकर (वय.८ रा. तिरोडा) अशोक गजानन बागडे (वय.५५ रा. नागपूर) प्रितम मन्साराम शेंडे (वय.२० रा. नागपूर) यांना उपचारासाठी भंडारा येथे दाखल करण्यात आले. तर, काही रुग्णांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नागपूर शहरातील अमित झिलपे या तरुणाचा १४ फेब्रुवारीला गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील मुलीशी लग्न सोहळा होता. त्यासाठी नागपूरवरून खासगी बस करून वऱ्हाड तिरोडाला पोहोचली. रात्री लग्नसोहळा आटोपल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास तिरोडावरून वऱ्हाड घेऊन बस नागपूरच्या दिशेने निघाली. पहाटे पाचच्या सुमारास बस नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील शिंगोरी फाट्याजवळ उभ्या कंटेनरवर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला. वऱ्हाडामध्ये नागपुरातील गांधीबाग येथील पोलीस कॉलनीमधील लोक असल्याची महिती समजली आहे. साखर झोपेत असलेल्या लोकांना अचानक बस आदळल्याचा आवाज आला. मात्र, नेमके काय झाले हे त्यांना अजूनही कळत नाही. या अपघाताने आनंदाच्या लग्न सोहळ्यामध्ये दुःखाचे सावट निर्माण केले आहे.

हेही वाचा- नागपुरात अपघातामध्ये दोघांचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Last Updated : Feb 15, 2020, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.