ETV Bharat / state

कोंढा गावातील एटीएम फोडले; मात्र कोणी, प्रश्नचिन्ह निर्माण

कोंढा गावातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम हे शनिवारी रात्री फोडले गेले. मात्र, हे एटीएम चोरांनी चोरले की त्यात पैसे नसन्याच्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी फोडले याबाबत संशय आहे. तर, बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही याबाबत पोलिसात तक्रार केली नसल्याने परिसरात याविषयी विविध चर्चा सुरू आहे.

एटीएम
author img

By

Published : Nov 17, 2019, 7:53 PM IST

भंडारा - जिल्ह्यातील कोंढा गावात असलेले एटीएम शनिवारी फोडल्याची घटना घडली. तर, या एटीएममध्ये पैसैच नव्हते असे बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, त्यांनी दिवसभर याची तक्रार पोलिसात दिली नसल्याने, हा एटीएम नेमका कोणी आणि का फोडला असा प्रश्नचिन्ह निर्मार्ण होत आहे. हे एटीएम चोरांनी फोडले की पैसे नसल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी, हाही प्रश्न निर्माण झाला असून परिसरात या विषयी चर्चा सुरू होती. मात्र, तक्रार मिळाली नसल्याने पोलिसांनी अजूनही या प्रकरणी चौकशीला सुरुवात केली नाही.

बँक ऑफ इंडियाचे एटीएम
कोंढा गावातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम

पवनी तालुक्यातील कोंढा या गावात बँक ऑफ इंडियाचे एटीएम शनिवारी रात्री फोडण्यात आले. रविवारी सकाळी ही घटना लोकांच्या लक्षात आली. तर, एटीएममध्ये पैसे नव्हते त्यामुळे बँकेचे नुकसान झाले नसल्याने बँक अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. असे असले तरी या घटनेनंतर बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण, या एटीएममध्ये नेहमीच पैसे नसल्याने लोक बँकेवर नाराज असल्याचे समजते. या एटीएममध्ये पैसे नसल्याची तक्रार अनेकदा गावातील लोकांनी केली होती. मात्र, बँकेने याकडे नेहमी दुर्लक्ष केले. यातच शनिवारी रात्री हे एटीएम फोडले गेले तेव्हाही त्यामध्ये अजिबात पैसे नव्हते. त्यामुळे पैसे नसल्याच्या रागातून लोकांनी हे एटीएम फोडले की, पैसे चोरण्याच्या उद्देशाने चोरांनी फोडले हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या चोरीची माहिती बँक अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने कोणीही अधिकारी आले नाही किंवा बँकेतर्फे पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली नाही. तक्रार न मिळाल्याने पोलिसांनी अजूनही कोणतीही चौकशी सुरू केली नाही. एटीएम तोडल्यानंतरही अधिकारी तक्रार का दिली नाही हे न समजणारे आहे.

हेही वाचा - शासकीय योजनांच्या नावाने वृद्ध महिलांची लूट, आरोपी महिलेला अटक

हेही वाचा - आई-बापाविना पोरक्या झालेल्या मुलांसाठी व्हा‌ॅट्सअप ग्रुपची 25 हजारांची मदत

Intro:Body:Anc : - कोंढा गावातील एटीएम फोडल्याचे रविवारी समजले मात्र या मध्येच नोव्हतें असे बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले मात्र त्यांनी दिवसभर याची तक्रार पोलिसात दिली नसल्याने हा एटीएम नेमका कोणी आणि का फोडला चोरांनी की पैसे नसल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी हा प्रश्न निर्माण झाला असून परिसरात या विषयी चर्चा सुरू होती. तक्रार मिळाली नसल्याने पोलिसांनी अजूनही चौकशीला सुरुवात केली नाही.
पवनी तालुक्यातील कोंढा या गावात बँक ऑफ इंडिया चा atm रात्री फोडण्यात आला सकाळी ही घटना लोकांच्या लक्षात आली atm मध्ये पैसे नसल्याने बँकेचे नुकसान झाले नसल्याने बँक अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला असली या घटनेनंतर बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण या एटीएम मध्ये नेमीच पैसे नसल्याने लोक बँकेवर नाराज असल्याचे समजते पुष्कळदा या atm मध्ये पैसे नसल्याची तक्रार गावातील लोकांनी केली होती मात्र बँकेने या कडे नेहमी दुर्लक्ष केले काल रात्री हा atm फोडला गेला तेव्हाही या मध्ये अजिबात पैसे नोव्हतें त्यामुळे पैसे नसल्याच्या रागातून लोकांनी एटीएम फोडला की पैसे चोरण्याच्यास उद्देशाने चोरांनी फोडला हा प्रश्न उपस्थित झाला आहे. चोरीची माहिती बँक अधिकाऱ्यांना देण्यात आली मात्र रविवार सुट्टीचा दिवस असल्याने कोणीही अधिकारी आले नाही किंवा बँके तर्फे पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आंही आणि तक्रार न मिळाल्याने पोलिसांनी अजूनही कोणतीही चौकशी सुरू केली नाही. एटीएम तोडल्या नंतरही अधिकारी तक्रार का दिली नाही हे न समजणारे आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.