ETV Bharat / state

भंडाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह; ओळख लपवण्यासाठी शरीरावर टाकले अॅसिड

गोंडउमरी गावातील लोक रोजगार हमीच्या कामावर जात होते. या वेळी गोंडउमरी ते वांगी लगतच्या वन क्षेत्रात रेल्वे क्रॉसिंगच्या समोर सिग्नलजवळ या महिलेचा मृतदेह झाडाला बांधल्याचे लोकाना दिसले. मृत महिलेचा अॅसिड टाकून चेहरा विद्रृप केल्याचे दिसून आले. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

author img

By

Published : Jun 4, 2019, 7:25 PM IST

भंडारा - साकोली तालुक्यातील गोंडउमरी वन क्षेत्राजवळ एका 27 वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह झाडाला गळा बांधून लटकवलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे. दोरीने गळा आवळून हत्या करून ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर अॅसिड टाकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसानी वर्तवला आहे. महिलेची ओळख पटण्यासाठी आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

गोंडउमरी गावातील लोक रोजगार हमीच्या कामावर जात होते. या वेळी गोंडउमरी ते वांगी लगतच्या वन क्षेत्रात रेल्वे क्रॉसिंगच्या समोर सिग्नलजवळ या महिलेचा मृतदेह झाडाला बांधल्याचे लोकाना दिसले. मृत महिलेचा अॅसिड टाकून चेहरा विद्रृप केल्याचे दिसून आले. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

हा प्रकार लक्षात येताच गावकरी घटनास्थळी पोहोचले. याविषयी साकोली पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासणीत महिलेची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या करून ओळख लपवण्यासाठी महिलेच्या शरीरावर अॅसिड फेकल्याचे गेले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.

या महिलेच्या गळ्यात काळ्या मन्यामध्ये गुंफलेली सोन्याची पोत, अंगावर लाल रंगाची साडी आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यातून महिला हरवल्याची तक्रार आहे का? याचा शोध पोलीस घेत आहे. महिलेची ओळख पटवण्यासाठी आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, अजूनही काही पुरावा हाती लागलेला नाही. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनसाठी साकोली रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास साकोली पोलीस करत आहेत.

Intro:Anc : भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील गोंडउमरी वन क्षेत्राजवळ एका 27 वर्षीय अज्ञात महिलेचे प्रेत झाडाला गळा बांधून लटकविलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे, दोरीने गळा आवळून हत्या करून ओळख लपविण्यासाठी ऍसिड घातल्या गेल्याचा प्राथमिक अंजदाज पोलिसांनी वर्तविला आहे. महिलेची ओळख पाठविण्यासाठी आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.Body:गोंडउमरी गावातील लोक रोजगार हमीच्या कामावर जात असतांना गोंडउमरी ते वांगी लगतच्या वन क्षेत्रात रेल्वे क्रॉसिंगच्या समोर सिग्नल जवळ या महिलेचे प्रेत झाडाला बांधून दिसून आले,एसिड टाकून चेहरा विद्रूप अवस्थेत दिसून आला, या मुळे गावात खळबळ उडाली त्यामुळे गावकरी घटनास्थळी येऊन पोहोचले, याविषयी साकोली पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचले, प्राथमिक तपासणी मध्ये या महिलेचा नोयलॉन च्या दोरीने गळा आवळून हत्या केली असावी आणि ओळख लपविण्यासाठी महिलेच्या शरीरावर ऍसिड घातले गेले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तविला गेला आहे,
या महिलेच्या गळ्यात काळ्या मन्यामध्ये गुंफलेली सोन्याची पोत असून अंगावर लाल रंगाची साडी आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यातून महिला हरवल्याची तक्रार आहे का याचा शोध पोलीस घेत आहे.
महिलेची ओळख पाठविण्यासाठी आणि आरोपीच्या शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते मात्र अजूनही काही पुरावा हाती लागला नाही, महिलेचे प्रेत शवविच्छेदनसाठी साकोली रुग्णालयात पाठविण्यात आले असून, अधिक तपास साकोली पोलीस करीत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.