ETV Bharat / state

Boat Stuck in River Video : नदीत अडकली नाव; नावड्याच्या प्रसंगावधानाने वाचले 10 शेतकऱ्यांचे जीव

लाखांदूर तालुक्यातील सोनी आवळी हे गाव वैनगंगा व चुलबंद नदीने व्यापले आहे. त्यामुळे या गावाचा पुनर्वसन झाला आहे. मात्र शेतकऱ्याच्या शेती असल्यामुळे शेतकरी चुलबंद नदीतून ये जा करत असतात. सध्या शेतीचे हंगाम सुरू असल्याने मंगळवारी सकाळी महिला आणि पुरुष असे 10 शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी नावेत बसले होते. मात्र नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली पाण्याचा प्रवाह वाढल्याने नाव बुडू लागली. ( Boat stuck in chulband river in Bhandara )

Boat Stuck in River Video
नदीत खडकाला अडकली नाव
author img

By

Published : Jul 6, 2022, 5:44 PM IST

भंडारा - जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात 10 शेतकऱ्यांचा जीव थोडक्यात वाचला. तालुक्यातून वाहणाऱ्या चुलबंद नदीला मंगळवारी सकाळी अचानक पूर आल्याने नदी पार करणारी नाव बुडायला लागली. नावाडाने प्रसंगावधान साधत नाव एका मोठ्या खडकाला अडकवली. त्यामुळे सर्व 10 ही शेतकरी यांना खडकाचा आधार मिळाला. गावकऱ्यांनी दुसऱ्या नावेने सर्व शेतकर्यांना सुखरूप नदी बाहेर काढले. ( Boat stuck in chulband river in Bhandara )

नदीत खडकाला अडकली नाव

शेतीवर जात होते कामासाठी - लाखांदूर तालुक्यातील सोनी आवळी हे गाव वैनगंगा व चुलबंद नदीने व्यापले आहे. त्यामुळे या गावाचा पुनर्वसन झाला आहे. मात्र शेतकऱ्याच्या शेती असल्यामुळे शेतकरी चुलबंद नदीतून ये जा करत असतात. सध्या शेतीचे हंगाम सुरू असल्याने मंगळवारी सकाळी महिला आणि पुरुष असे 10 शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी नावेत बसले होते. मात्र नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली पाण्याचा प्रवाह वाढल्याने नाव बुडू लागली. अशातच नावाडी नारायण कुंभरे यांनी प्रसंगावधान राखत एका मोठ्या दगडाला अडकवली त्यामुळे 10 शेतकरी नदीत आडकुन राहिले.

गावकऱ्यांनी केली मदत - नाव पाण्यात अडकल्याने कोणीही पाण्यात बुडाला मात्र नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने अडकून असलेल्या 10 ही लोकांचे जीव मुठीत होते. गावकरी नदीत अडकाचे लक्ष्यात येताच नदीच्या दुसऱ्या तीरावर असण्याऱ्या लोकांनी लागलीच दुसरी नाव नदीत घालत पाण्याच्या विरुद्ध दिशेने जाऊन त्या सर्वही 10 लोकांना सुखरूप बाहेर काढले. नावाडाच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळल्याने पुरात अडकलेल्यानी सुटकेचा श्वास सोडला.

जुलै महिन्यात दमदार पावसाचा अंदाज - जुलै महिन्यात सर्वात जास्त पाऊस होतो, अशी शक्यता असते. त्यामुळे या महिन्यात बंगालच्या खाडीत किमान दोन ते तीन वेळा कमी दाबाचे पट्टे (लो प्रेशर एरिया) तयार झाल्यास जून महिन्यातील पावसाचा अनुशेष भरून निघेल. मात्र, पुढील काही दिवसांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल, असे कोणताही सिस्टीम तयार होईल, अशी शक्यता दिसत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा - Municipal Corporation Election 2022 : महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची लागणार कसोटी तर भाजपपुढे आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.