ETV Bharat / state

भंडारा जिल्हा परिषद पदभरती ; पुनर्परिक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे थेट प्रक्षेपण

भंडारा जिल्हा परिषदेच्या पदभरती घोळानंतर पुन्हा परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणीचे काम थेट प्रक्षेपण भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेल्या एका एलईडी वॉलवरून करण्यात आले.

Live broadcasting of Re-exam Answer Sheet checking
भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय
author img

By

Published : Feb 1, 2020, 9:01 PM IST

भंडारा - जिल्हा परिषदेच्या पदभरतीत घोळ झाल्याने रद्द झालेली परीक्षा पुन्हा घेण्यात आली. या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचा तपासणीचे कामाचे जिल्हाधिकारी कार्यालयात थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे एकाच दिवशी परीक्षा आणि त्याच दिवशी निकाल घोषित करून, ही प्रक्रीया पारदर्शकपणे राबवण्याची दक्षता प्रशासनाने घेतली.

भंडारा जिल्हा परिषद पदभरतीच्या पुनर्परिक्षेतील उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे एलईडी वॉलवर तपासणीचे थेट प्रक्षेपण...

पेपर तपासणीचा थेट प्रक्षेपण ही पहिल्यांदाच आणि नव्याने राबवलेली प्रक्रिया पाहता, या प्रयोगाची सर्वत्र चर्चा आणि प्रशंसा होत आहे.

हेही वाचा... 'भारताच्या अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यात अपयशी ठरणारा अर्थसंकल्प'

भंडारा जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जातीसाठी 12 जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात आली होती. कनिष्ठ अभियंता आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेत घोळ झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे चार अधिकारी आणि अपेक्षापेक्षा जास्त गुण घेणारे चार विद्यार्थी, अशा एकूण आठ जणांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास अजूनही सुरू आहे.

हेही वाचा... 'अर्थसंकल्पातून अपेक्षाभंग, शेतीसह ग्रामीण विकासासाठीच्या तरतुदी निराशाजनक'

जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी एका पत्रपरिषदेत ही परीक्षा रद्द झाल्याचे सांगत नव्याने परीक्षा घेणार असल्याचेही सांगितले. त्यानुसार शहराच्या दोन विविध परीक्षा केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेण्यात आली.
परीक्षा आटोपल्यानंतर उत्तर पत्रिका थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आल्या. त्या ठिकाणी तपासणी करून अंतिम निकाल लावला गेला. मात्र यासाठी अतिरिक्त दक्षता घेण्यात आली. भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणून चक्क ओएमआर शीटची अर्थात उत्तरपत्रिकेची तपासणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एक मोठी एलईडी वॉल लावण्यात आली. या ठिकाणी परीक्षा देणारे उमेदवार, सामान्य नागरिक, अधिकारी आणि कर्मचारी पेपर तपासणीचे थेट प्रक्षेपण पाहत होते. जिल्ह्यात पहिल्यांदाच पेपर तपासणीचा आणि निकालाचा हा प्रयोग प्रशासकीय विभागातील पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवेल. या प्रयोगाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हेही वाचा... शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या बाजूलाच; अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

Intro:Body:Anc : जिल्हा परिषदेच्या नोकरी भरती घोळ झाल्याने रद्द झालेली परीक्षा पुन्हा घेऊन या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचा तपासणीचा थेट प्रक्षेपण करण्यात आले. एकाच दिवशी परीक्षा आणि त्याच दिवशी निकाल घोषित करून ही प्रक्रिया पारदर्शक राबविण्याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. पेपर तपासणीचा थेट प्रक्षेपण ही पहिल्यांदाच आणि नव्याने राबविलेल्या प्रक्रियेची सर्वत्र चर्चा आणि प्रशंसा होत आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जातीसाठी 12 जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात आली होती. कनिष्ठ अभियंता आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेत घोड झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे चार अधिकारी आणि अपेक्षा पेक्षा जास्त गुण घेणारे चार विद्यार्थी अशा एकूण आठ जणांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्याचा तपास अजूनही सुरू आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रण यांनी एका पत्रपरिषदेत ही परीक्षा रद्द झाल्याचे सांगत नव्याने परीक्षा घेणार असल्याचे सांगितले त्यानुसार शहराच्या दोन विविध परीक्षा केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेण्यात आली.
परीक्षा आटोपल्यानंतर उत्तर पत्रिका थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आल्या त्या ठिकाणी तपासणी करून अंतिम निकाल लावला गेला. मात्र यासाठी अतिरिक्त दक्षता घेण्यात आली भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणून चक्क ओ एम आर सीटची अर्थात उत्तरपत्रिकेची तपासणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एक मोठी एलईडी वॉल लावण्यात आली. या ठिकाणी परीक्षा देणारे उमेदवार, सामान्य नागरिक, अधिकारी आणि कर्मचारी पेपर तपासणीचे थेट प्रक्षेपण पहात होते. जिल्ह्यत पहिल्यांदाच पेपर तपासणीचा आणि निकालाचा हा प्रयोग प्रशासकीय विभागातील पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवेल. या प्रयोगाचा सर्वत्र कौतुक केला जात आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.