भंडारा - कोरोनाच्या उपचारासाठी सुरुवातीपासून रेमडेसीवीर इंजेक्शनचा वापर केला जातो. त्यामुळेच याचा काळा बाजार होऊन चढ्या दराने हे इंजेक्शन विकले जाऊ लागले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी भंडाऱ्यामध्ये आता एकाच औषधी दुकानात आणि तेही शासकीय दराने रेमडेसीवीर उपलब्ध असेल. यामुळे काळाबाजार करणाऱ्यांवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी व्यक्त केला आहे.
केवळ 2360 मध्ये मिळणार रेमडेसीवीर -
भंडारा जिल्हात कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी जास्त होत आहे. मात्र ऑगस्टपासून रुग्ण संख्या वाढत असताना बऱ्याच कोरोनाच्या रुग्णांचा उपचारासाठी हे इंजेक्शन मिळत नसे किंवा 20 हजारापर्यंत याचा दर सांगितले जात असे. कुटुंबातील व्यक्तीचे जीव वाचविण्यासाठी परिवारातील लोक मिळेल त्या दारात हे रेमडेसीवीर इंजेक्शन खरेदी करीत असत. आता यावर उपाय शोधत जिल्हाधिकारी यांनी हे इंजेक्शन सर्वत्र न मिळता केवळ एकाच ठिकाणी हे इंजेक्शन मिळाल्यास नफेखोरीवर नियंत्रण मिळविता येईल, म्हणून भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकातील जेनेरिक मेडिसीन दुकानाला हे रेमडेसीवीर इंजेक्शन विकण्याची परवानगी दिली आहे. हे इंजेक्शन सर्वांसाठी केवळ 2360 रुपयांना मिळणार आहे.
भंडारा जिल्ह्यात 'रेमडेसीवीर' मिळणार केवळ 2,360 रुपयांत.. बसणार काळाबाजाराला चाप - रेमडेसीवीर इंजेक्शन भंडारा
प्रधानमंत्री जण औषधी केंद्राच्या माध्यमातून प्रत्येकाला रेमडेसीवीर इंजेक्शन मिळणार असून यासाठी केवळ केवळ आधारकार्ड, डॉक्टरची चिठ्ठी आणि कोरोना झाल्याचे सर्टिफिकेट असल्यास हे इंजेक्शन मिळेल. हे इंजेक्शन सर्वांसाठी केवळ 2360 रुपयांना मिळणार आहे.