ETV Bharat / state

भाजप नगराध्यक्ष, नगरसेवकांनी एकमेकांवर लावले भ्रष्टाचाराचे आरोप - bhnadara nagar parishad

नगर नगरपरिषेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवक नितीन धकाते यांनी नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप लावले. तसेच मेंढेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी करीत त्यांना घराचा आहेर दिला आहे. तर, हे सर्व आरोप बिनबुडाचे असून नगरसेवकांनीच अनेक आर्थिक घोटाळे केल्याचा आरोप भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार आणि भंडारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी केला आहे.

भाजप नगराध्यक्ष, नगरसेवकांनी एकमेकांवर लावले भ्रष्टाचाराचे आरोप

author img

By

Published : Feb 18, 2020, 10:02 PM IST

भंडारा - नगरपरिषदेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवक नितीन धकाते यांनी नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप लावले. तसेच मेंढेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत त्यांना घरचा आहेर दिला आहे. तर, नगरसेवकाने लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. या नगरसेवकाने स्वतःच भरपूर आर्थिक घोटाळे केले आणि त्यामुळे त्यांना नुकतीच तुरुंगवारी करावी लागली असल्याचे नगराध्यक्ष आणि खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले. यासोबतच या नगरसेवकाने पक्षाचे व्हिपसुद्धा नाकारले असल्याने त्यांच्यावर पक्षांतर्गत ही कारवाई केली जाईल. त्यांना वेगळ्या पक्षात जायचे असल्याने ते लोकांची सहानभूती मिळवण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप करत असल्याचे नगराध्यक्ष मेंढे यांनी सांगितले.

भाजप नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी एकमेकावर लावले भ्रष्टाचाराचे आरोप

मागील ३ वर्षाअगोदर पहिल्यांदाच भंडारा नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता स्थापन झाली आणि नगराध्यक्ष म्हणून भाजपचे सुनील मेंढे निवडून आले. तर, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हे नगराध्यक्ष भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार म्हणूनही निवडून आले. ते खासदार झाल्यानंतर नगराध्यक्षपदाचा राजीनामा देतील, असे नगरसेवकांना वाटत होते. मात्र, नगराध्यक्षांनी राजीनामा न दिल्याने भाजपमध्ये धुसफूस सुरू झाली. त्याचाच परिणाम ८ दिवसांपूर्वी झालेल्या उपाध्यक्षपद आणि सभापतीच्या निवडणुकीत दिसून आला.

भाजपची सत्ता असतानाही अपक्ष असलेल्या दिनेश भुरे यांना उपाध्यक्ष बनण्यासाठी समर्थन द्यावे लागले. तर, सभापतीच्या निवडणुकीत भाजपच्या २ आणि भाजप समर्थित १ अपक्ष अशा ३ लोकांनी बंडखोरी केल्याने भाजपच्या २ सभापतींना पराभवाचे तोंड पाहावे लागले. मात्र, हे प्रकरण इथेच थांबले नाही तर भाजपचे बंडखोर नगरसेवक नितीन धकाते यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यात नगराध्यक्ष आणि खासदार असलेल्या मेंढे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करीत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी धकातेंनी केली. मेंढे यांनी आपल्या भाच्याच्या नावाने स्वतःचे कामाचे बिल काढले तसेच पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन मध्येही त्यांनी भ्रष्टाचार केला असा आरोप धकाते यांनी केला. तसेच मी भाजपच्या विरोधात नाही तर नगराध्यक्षांच्या कामाच्या विरोधात असल्याचे धकातेंनी यावेळी सांगितले.

नगराध्यक्षांनी स्वतःहून राजीनामा दिल्यास भाजपकडे असलेल्या संख्या बळानुसार भाजपचा अध्यक्ष पुन्हा होईल. मात्र, अध्यक्षांनी स्वतःहून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही तर त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला जाईल. यासाठी ३६ पैकी २७ नगरसेवक पाठिंबा देतील असे धकाते यांनी सांगितले. मात्र, पत्रकार परिषदेमध्ये ते स्वतः एकटेच उपस्थित होते हे विशेष.

हेही वाचा - खुल्या जलतरण स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद, नाना पटोलेंचीही उपस्थिती

यासर्व आरोपांविषयी नगराध्यक्ष मेंढे यांना विचारले असता यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आरोप लावणारा नगरसेवक हा स्वतः बांधकाम व्यवसाय करतो. या व्यवसायात त्यांनी बरेच आर्थिक घोटाळे केले असल्याने या नगरसेवकाला नुकतीच तुरुंगवारी करावी लागली. यावेळेस मी त्याला कोणतीही मदत केली नाही तसेच या नगरसेवकाची उपाध्यक्षपदासाठी इच्छा होती. मात्र, या प्रकरणामुळे भाजपच्या सर्व नगरसेवकांनी त्याला उपाध्यक्ष पदासाठी नामंजूरी दिली. त्यामुळे बिथरलेल्या या नगरसेवकाने माझ्यावर गैरव्यवहाराचे खोटे आरोप केले असल्याचे मेंढे म्हणाले. या आरोपाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी स्वतः केली आहे. पार्टी विरुद्ध काम केल्याने आणि पार्टीचे व्हीप नाकारल्याने पक्षाच्या नियमानुसार त्यांच्यावर कार्यवाही करणार आहोत. तसेच त्यांनी केलेले सर्व आर्थिक घोटाळे याचीही चौकशी लावण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असे नगराध्यक्ष आणि खासदार सुनील मेंढे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - भंडाऱ्यामध्ये विचित्र अपघात, राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिसाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.