ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात सोमवारपासून सर्वच दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत राहणार खुली - भंडारा लॉकडाऊन अपडेट्स

भंडारा जिल्ह्यात सोमवारपासून बाजारपेठा दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी 7.67 टक्के असल्याने जिल्ह्याला अंशतः लॉकडाऊन राहणार आहे.

भंडारा
भंडारा
author img

By

Published : Jun 5, 2021, 10:03 PM IST

भंडारा - सोमवारपासून (7 जून) भंडारा जिल्ह्यात बाजारपेठा दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. लग्न समारोहामध्ये केवळ 50, तर अंत्यविधीच्या कार्यक्रमात केवळ 20 लोकांना परवानगी राहणार आहे. सिनेमागृह मात्र अजूनही बंद राहणार आहेत. भंडारा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी 7.67 टक्के असल्याने जिल्ह्याला अंशतः लॉकडाऊन राहणार आहे. शनिवारी (5 जून) भंडारा जिल्ह्यात 33 कोरोना रुग्ण आढळून आले, तर 228 रुग्ण बरे झाले.

905 पैकी केवळ 73 बेडवर रुग्ण

भंडारा जिल्ह्यात एकूण 905 आयसोलेशन बेड आहेत. सध्या केवळ 73 रुग्णांवर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 481 ऑक्सिजन बेड आहेत. सध्या 49 ऑक्सिजन बेडवरच उपचार सुरू आहेत. तर 266 आयसीयू बेड आहेत. 50 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

काय सुरू आणि काय बंद?

सोमवारपासून भंडारा जिल्ह्यात नवीन नियमानुसार, सर्वच दुकाने सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंटमध्ये 50% क्षमतेनुसार जेवणाची व्यवस्था 4 वाजेपर्यंत करता येईल. त्यानंतर होम डिलिव्हरी करून जेवण देता येईल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, उद्याने हे सर्व सकाळी 5 ते 9 पर्यंत दररोज सुरू राहतील. जिम 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

मागील 4 दिवसात एकही मृत्यू नाही

जिल्ह्यात आज 228 रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 57292 झाली आहे. आज 33 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59164 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.84 टक्के आहे. विशेष म्हणजे मागील 4 दिवसांपासून जिल्ह्यात एकही मृत्यू झालेला नाही. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर 01.78 टक्के एवढा आहे.आतापर्यंत 3 लाख 93 हजार 20 जणांची घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 59164 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 07, मोहाडी 02, तुमसर 05, लाखनी 10 आणि साकोलीतील 09 व्यक्तींचा समावेश आहे.

त्रिसूत्री धोरणामुळे कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण

'भंडारा जिल्ह्यातील रुग्णसंख्या एप्रिल महिन्यामध्ये 1600 पर्यंत गेली होती. शासनाने टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्री धोरणाचा अवलंब केला. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवता आले', असे भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये महिला तलाठी कर्मचाऱ्याला नगरसेवकाकडून मारहाण, महिलेकडून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.