ETV Bharat / state

Maha First Agniveer Died : अग्निवीर अक्षय गवते यांच्या पार्थिवावर आज अंतिमसंस्कार, संपूर्ण गाव शोकाकूल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 10:48 AM IST

Updated : Oct 23, 2023, 11:22 AM IST

Maha First Agniveer Died : बुलढाण्यातील अग्निवीर अक्षय गवते यांना सियाचिनमधील ग्लेशियरवर कर्तव्य बजावताना वीरमरण आलंय. आज त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी पिंपळगाव सराई इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गावात शोकाकूल वातावरण आहे.

Maha First Agniveer Died
Maha First Agniveer Died
अक्षयच्या शिक्षक, वडिलांना अश्रू अनावर

बुलढाणा Maha First Agniveer Died : अग्निवीर अक्षय गवते यांच्या मूळ गावी बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासाठी त्यांचं पार्थिव छत्रपती संभाजीनगरमार्गे पिंपळगाव सराईत सकाळी दाखल होणार आहे. 20 ऑक्टोंबरच्या रात्री कर्तव्यावर असताना वीर जवान अक्षय लक्ष्मण गवते यांना सियाचीनमधील याचीन ग्लेशियमध्ये वीरमरण आलंय.

संपुर्ण गावावर शोककळा : संपूर्ण पिंपळगाव सराई गावात ज्या मार्गानं अक्षयचं पार्थिव गावात दाखल होणार आहेे, तिथे जमा झाले आहे. तिथं सकाळपासूनच गावातील गावकरी, विद्यार्थी, विद्यार्थिनी रस्त्याच्या दूुतर्फा उभं राहून रांगोळ्या काढून जवानाला अभिवादन देण्याकरिता सज्ज झाले आहेत. अक्षयच्या निधनानं गावावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरलीय.

शिक्षकांपासून, मित्र, वडीलांना अश्रू अनावर : पिंपळगाव सराईतील अक्षय गवते यांना वीरमरण आल्यानं त्यांचे शिक्षक, मित्र व वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. अक्षय म्हणजे मुर्ती लहान पण किर्ती महान होता. तो अतिशय शिस्तप्रिय होता. तसंच तो देशासाठी कर्तव्य बजावताना त्याला वीरमरण आलंय, अशा भावना अक्षयच्या शिक्षक, मित्र व वडिलांनी व्यक्त केल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील पिंपळगाव सराई येथे राहणारा अक्षय सर्वांना कायमचा सोडून गेला. पण त्याच्याबद्दल त्याला लहानपणापासून ते आज पर्यंत पाहणारे गावकरी, मित्र, वडील शिक्षक यांना त्याच्याबद्दल आज अभिमान वाटतो की त्यानं आपल्या कुटुंबाकरता व देशाकरता एक मोठे स्वप्न बाळगलं होतं. त्याकरिता थेट अग्नीवीर म्हणून सैन्यात दाखल झाला. देशाला व गावाला अभिमान वाटावा असा अक्षय कायमस्वरूपी गावाकरता अभिमान राहणार अशा भावना अनेकजण व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

  1. Maha First Agniveer Died : महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला वीरमरण; सियाचिनमध्ये बजावत होते कर्तव्य
  2. Rahul Gandhi : अग्निवीर योजना आरएसएसकडून आली; राहुल गांधींचा लोकसभेत घणाघात
  3. Agniveer Amritpal : अग्निवीर म्हणून भरती झालेल्या सैनिकाला मृत्यूनंतर हुतात्म्याचा सन्मान का नाही? सैन्यानं दिलं 'हे' स्पष्टीकरण

Last Updated : Oct 23, 2023, 11:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.