ETV Bharat / state

100 वर्ष जुन्या पुलावरील वाहतूक प्रशासनाने केली बंद, तरीही रहदारी सुरूच

वैनगंगा नदीवरील 100 वर्षे जुना असणाऱ्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

author img

By

Published : Jul 3, 2019, 8:58 PM IST

100 वर्ष जुन्या पुलावरील वाहतूक प्रशासनाने केली बंद, तरीही रहदारी सुरूच

भंडारा - वैनगंगा नदीवरील 100 वर्षे जुना असणाऱ्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी कोणी प्रवास केला आणि कोणती अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे. मात्र, तरीही लोक या याकडे नागरिक दुर्लक्ष करून या पुलावरून वाहतुक करतच आहेत.

नवीन पुलावरून गेल्यास लांबचे अंतर पार करून जावे लागते. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात याच पूलाचा वापर करत आहेत. वैनगंगा नदीवरील 100 वर्षे जुना इंग्रज कालीन पूल 2016 मध्ये वाहतुकीसाठी धोकादायक ठरवण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला. नागरिकांच्या माहितीसाठी पुलाच्या दोन्ही बाजूला ठळक अक्षरात फलक लावले आहेत.

हा पूल भंडारा ते पवनी साकोली या मार्गांना जोडणारा एकमेव पूल होता. पावसाळ्यात बरेचदा अतिवृष्टी झाल्यानंतर हा पूल पाण्याखाली येत असे, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पूर्णपणे बंद व्हायचा, याला पर्याय म्हणून एक नवीन मोठा पूल तयार करण्यात आला आहे. या पूलाच्या निर्मितीनंतरही नवीन आणि जुना दोन्ही पूल वाहतुकीसाठी सुरू होते. मात्र, 2016 मध्ये या इंग्रज कालीन जुन्या पुलाची तपासणी केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला.

जुन्या पूलावरून सर्वच वाहतूक बंद झाल्याने नवीन पुलावर वाहतुकीचे प्रमाण वाढले. बाहेरगावाहून येणाऱ्या कामगारांना सायकलवरून प्रवास करताना अडचणी निर्माण व्हायला लागल्या. त्यामुळे पादचारी लोकांनाही या वाढलेल्या वाहतुकीचा त्रास होत होता. त्यामुळे नागरिकांच्या मागणीवरून जुन्या पूलावर पादचारी आणि सायकलने जाणार्‍या लोकांसाठी एका भागावरून जाण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला. मात्र, आता या पूलावरून दुचाकी ऑटो रिक्षा यांची ही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे.

Intro:
ANC : वैनगंगा नदीवरील जुना पूल वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. कुणीही जबरीने पुलावरून प्रवास केल्याने कोणतीही अनुचित घटना घडल्यास शासनाची कोणतीही यंत्रणा जबाबदार राहणार नाही. हे वाक्य वैनगंगा नदीच्या सुरुवातीलाच ठळक अक्षरात बोर्डावर लिहलेले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करीत या पुलावरून दुचाकी, रिक्षा, ऑटो रिक्षा यांची वाहतुक सुरू आहे नवीन पुलावरून प्रवास लांब होतो त्यामुळे नागरिक या बंद पुलाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे.

Body:वैनगंगा नदीवर असलेले शंभर वर्ष जुने इंग्रज कालीन पूल 2016 मध्ये वाहतुकीसाठी धोकादायक ठरविण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी 8/8/ 2016 ला हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला. आणि नागरिकांच्या माहितीसाठी पुलाच्या दोन्ही बाजूला ठळक अक्षरात बोर्ड लिहून ठेवले. तेव्हापासून या लहान पुलावरून संपूर्ण जड वाहतूक बंद झाली.
हा पूल भंडारा ते पवनी साकोली या मार्गांना जोडणारा एकमेव पूल होता पावसाळ्यात बरेचदा अतिवृष्टी झाल्यानंतर हा पूल पाण्याखाली येत असे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा पूर्णपणे बंद व्हायचा, याला पर्याय म्हणून एक नवीन मोठा पूल तयार करण्यात आला. या पुलाच्या निर्मितीनंतरही नवीन आणि जुना दोन्ही पूल वाहतुकीसाठी सुरू होते मात्र 2016 मध्ये या इंग्रज कालीन जुन्या पुलाची तपासणी केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी लगेच हा पूल वाहतुकीसाठी बंद केला.
जुन्या पुलावरून सर्वच वाहतूक बंद झाल्याने नवीन पुलावर वाहतुकीचे प्रमाण वाढले बाहेरगावाहून येणाऱ्या कामगारांना सायकलवरून प्रवास करताना अडचणी निर्माण व्हायच्या तसेच पादचारी लोकांनाही या वाढलेल्या वाहतुकीचा त्रास होत होता. त्यामुळे नागरिकांच्या मागणीवरून पादचारी आणि सायकलने जाणार्‍या लोकांसाठी पुलाचा एका भागावरून जाण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला मात्र आता या पुलावरून दुचाकी ऑटो रिक्षा यांची ही मोठ्या प्रमाणात आवागमन सुरू झाले आहे. त्यामुळे या पुलावर वाहतूक वाढल्याचे दिसत आहे हा पूल जुना असल्यामुळे कधीही केव्हाही कोणतीही अनुचित घटना होऊ शकतं त्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर या पुलावरून जाण्यास टाळावे आणि नवीन पुलाचाच वापर करावा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.