ETV Bharat / state

भंडाऱ्यात कोरोना नियम मोडणाऱ्या मंगल कार्यालयावर धडक कारवाई - भंडारा मंगल कार्यालय बातमी

अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर मंगल कार्यालयाच्या मालकांनी आणि वधू-वरातर्फेही अधिकाऱ्यांना दंड न घेण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र अशा पद्धतीने नियम मोडणाऱ्या लोकांवर कारवाई करत, मंगल कार्यालयाला १० हजार रुपायाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

भंडारा मंगल कार्यालय
भंडारा मंगल कार्यालय
author img

By

Published : Mar 20, 2021, 7:49 PM IST

Updated : Mar 20, 2021, 8:06 PM IST

भंडारा - नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालयाला भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर नगर परिषदेने १० हजाराचा दंड ठोठावला आहे. तहसीलदार, पोलीस व नगर पंचायतच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात मंगल कार्यालयावर पहिल्यांदाच अशी कारवाई झाली आहे. मात्र या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्या इतर मंगल कार्यालयाच्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत.

..म्हणून झाली कारवाई
भंडारामध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. लग्न समारंभामध्ये वधू कडून ५० लोक तर वर मंडळी कडील ५० लोकांची परवानगी आहे. लाखांदूर तालुक्यातील आशीर्वाद मंगल कार्यालयात एका विवाह सभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाखांदूरचे नायब तहसीलदार यांना सदर मंगल कार्यालयापुढे मोठी गर्दी दिसून आली. त्यानी लागलीच नगरपंचायत मुख्याधिकारी यांना सूचना दिली. दरम्यान पोलिसांच्या सहकार्याने संबंधीत मंगल कार्यालयाने लग्नाची परवानगी घेतली नसल्याचा आणि १०० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असल्याचे समोर आले आहे.

एवढा ठोठावण्यात आला दंड

कोरोना कालावधी मध्ये लग्न करायचे असल्यास त्याची रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र वधू-वरा तर्फे ही परवानगी घेण्यात आली नव्हती. याची जाणीव मंगल कार्यालयाच्या मालकाला होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर मंगल कार्यालयाच्या मालकांनी आणि वधू-वर तर्फेही अधिकाऱ्यांना दंड न घेण्याची विनंती केली होती. मात्र अशा पद्धतीने नियम तोडणाऱ्या लोकांवर कार्यवाही करत, मंगल कार्यालयावर १० हजार रुपायाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पहिली घटना
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाने जे नियम दिलेले आहेत त्या नियमांचे खरं तर सर्वांनी पालन करायला हवे. मात्र बरेचदा नागरिक याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढतो आहे. नुकताच अधिकाऱ्यांनी चौकशीमध्ये हे मान्य केल आहे, की कोरोना हा लग्नासारख्या सामुहिक कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोणत्याही मंगल कार्यालयावर अशा पद्धतीची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली नव्हती. जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. मात्र या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर मंगल कार्यालयाच्या मालकांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा-नागपुरात आता 31 मार्चपर्यंत संचारबंदी, पालकमंत्र्यांचे निर्देश

Last Updated : Mar 20, 2021, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.