भंडारा-जिल्ह्यात शनिवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. दोन आरोग्य कर्मचाऱ्यांसह 18 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, तर 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये भंडारा तालुक्यातील 12, लाखनी 1 व मोहाडी तालुक्यातील 5 व्यक्तींचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 235 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 370 झाली असून 127 सक्रिय रुग्ण तर 6 संदर्भित रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या 3 झाली आहे.
शनिवारी एका 21 वर्षीय तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. ही तरुणी नागपूर जिल्ह्यतील मौदा तालुक्यतील असून भंडारा जिल्ह्याच्या शेजारी तिचा गाव असल्याने तिला उपचारसाठी भंडारा आयसोलेशन वार्ड मध्ये आणण्यात आले होते. या मुलीचा भाऊ सुद्धा कोरोनाबाधित असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, प्रशासनाने शनिवारी पाठविलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये ही गोष्ट सांगण्यात आलेली नव्हती.
18 जणांमध्ये भंडारा तालुक्यातील 12 लोकांचा समावेश आहे. यामध्ये एक 31 वर्षीय महिला आरोग्य कर्मचारी आणि एक 36 वर्षीय पुरुष आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच 57 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला हे कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे पॉझिटिव्ह झाले आहेत. चेन्नई वरून आलेली 29 वर्षीय महिला आणि ठाणे वरून आलेली 7 वर्षीय मुलगी, गोवा वरून आलेला 34 वर्षे पुरुष, 28 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगा, 25 वर्षीय महिला आणि 68 वर्षीय महिला हे पॉझिटिव्ह आलेले आहेत.
मोहोडी तालुक्यामध्ये पॉझिटिव्ह आलेले पाच रुग्ण हे आयर्न अँड स्टील कंपनी वरठी येथील कामगार आहेत. 30 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, 41 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष, व 50 वर्षीय पुरुष हे बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे पॉझिटिव्ह निघाले आहेत. या कंपनीमध्ये सध्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कंपनीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर लाखनी तालुक्यातील 38 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे पॉझिटिव्ह आला आहे.
शनिवारपर्यंत आयसोलेशन वार्डमध्ये 160 व्यक्ती दाखल असून 797 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2253 व्यक्तींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात 45 व्यक्ती पॉझिटिव्ह तर 2208 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, राज्यात शनिवारी 12822 कोरोना रुग्णांची वाढ झाली. यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या 503084 अशी झाली आहे. शनिवारी 11081 रुग्ण बरे झाले आहेत.338362 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 147048 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.