भंडारा - जिल्ह्यातील 8 कोरोनाबधित रुग्णांना बरे झाल्यानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 9 झाली आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या 31 झाली आहे
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज रुग्णांची संख्या वाढत होती. बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांमुळे या रुग्णांमध्ये वाढ होत होती. मात्र, आज जिल्ह्यात एकही कोरोनाबधित रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आतापर्यंत 1 हजार 901 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 31 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 1 हजार 751 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर सध्या 126 नमुन्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.