भंडारा - जिल्ह्यातील एकूण 79 व्यक्तींपैकी 72 जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून अद्याप सात जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. यामध्ये निज्जामुद्दीनवरून आलेल्या सर्वांच समावेश आहे. तसेच 44 व्यक्तींना हॉस्पिटल क्वारंटाईनमधून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. हातावर होम क्वारंटाईनचा स्टॅम्प आसलेल्यांनी 28 दिवस घराबाहेर पडू नये असे, निर्देश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी दिले आहेत. आतापर्यंत होम क्वारंटाईन स्टॅम्प लावण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 17 हजार 232 आहे. यांसह सहा जणांची अलगीकरण कक्षात भरती करण्यात आलीय. तर सात व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. संस्थात्मक विलगीकरण कक्षात 13 व्यक्ती दाखल असून 13 जणांना आज डिस्चार्ज दिला आहे. आतापर्यंत 44 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून डिस्चार्ज मिळाला आहे.
1 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान मुंबई, पुणे व इतर राज्यातून परत आलेल्या व्यक्तींची संख्या 18 हजार 201 आले आहेत. यापैकी 969 व्यक्तींनी 28 दिवसांचा गृह विलगीकरण कालावधी पूर्ण केला आहे. तर 17 हजार 232 व्यक्तींना गृह विलगीकरणाचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण आढळला नसला, तरिही खबरदारसाठी मोठ्या प्रमाणात टेस्ट करण्यात येत आहेत.