ETV Bharat / state

'नियम पाळा, अन्यथा कायद्याचा बडगा'; जिल्ह्यात आतापर्यंत 4500 गुन्हे दाखल - bhandara lockdown news

लॉकडाऊनच्या काळात नियम मोडणाऱ्या 62 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 4000 दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आलीय. तसेच 236 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याचसोबत होम क्वारंटाईन केल्यानंतर देखील घराबाहेर फिरणाऱ्या 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

lockdown in bhandara
लॉकडाऊनच्या काळात नियम मोडणाऱ्या 62 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 4000 दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आलीय.
author img

By

Published : Apr 13, 2020, 5:35 PM IST

भंडारा - लॉकडाऊनच्या काळात नियमभंग करणाऱ्या 62 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 4000 दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आलीय. तसेच 236 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याचसोबत होम क्वारंटाईन केल्यानंतर देखील घराबाहेर फिरणाऱ्या 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात नियम मोडणाऱ्या 62 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 4000 दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आलीय.

या सर्व लोकांना भविष्यात न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार असून काहींना शिक्षा देखील भोगावी लागले. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी नियमांचे पालन करणे हेच त्यांच्यासाठी आणि समाजासाठी असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी सर्वांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, असे नियम प्रशासनाने केले आहे. मात्र काही नागरिक या नियमांचे पालन करत नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कायद्याचा बडगा उचलला आहे.

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 62 लोकांवर कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच होम क्वारंटाईन करण्यात अल्यानंतरही बाहेर फिरणाऱ्या 25 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. वारंवार घराबाहेर न पडण्याचे आवाहन केल्यानंतरही लोक ऐकत नसल्याने पोलिसांनी विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्या तब्बल 4000 जणांवर मोटार वाहतूक कायद्याअंतर्गत कारवाई केलीय. तर, 236 जणांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आता ही वाहाने लॉकडाऊन संपल्यानंतरच परत मिळणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.